किचनमधील ‘या’ ६ गोष्टी आरोग्यासाठी घातक, चुकूनही खाऊ नका

किचनमधील ‘या’ ६ गोष्टी आरोग्यासाठी घातक, चुकूनही खाऊ नका

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – किचनमध्ये खाण्याचे जवळपास सर्वच पदार्थ हे आरोग्यदायी असतात. परंतु नकळतपणे अशाही काही गोष्टी आपण आणतो, ज्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अशा पदार्थांचे चूकनही सेवन करून नये. शक्य असल्यास असे पदार्थ किचनमध्ये ठेवू नयेत. हे पदार्थ कोणते आणि त्याचे शरीरावर कोणते घातक परिणाम होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

हिरवे टोमॅटो
टोमॅटोच्या फांद्या, पानांमध्ये अल्कली नावाचा विषारी घटक असतो आणि हा घटक हिरव्या टोमॅटोमध्येही असतो. यामुळे हिरवे टोमॅटो खाण्यापासून दूर राहावे किंवा आगीवर भाजून खावेत, असे फॉक्स न्यूजने म्हटले आहे.

बदाम
गोड आणि हलका कडसर असे बदामचे दोन प्रकार असतात. एका शोधानुसार कडसर बदामामध्ये जास्त प्रमाणात हायड्रोजन सायनाइड आढळून येते, जे शरीरासाठी घातक ठरते.

मध
मधाच्या पोळ्यातून काढलेला मध तसाच खाऊ नये, कारण काही पोळ्यांच्या मधामध्ये ग्रेयानोटॉक्सिन आढळून येते. याचे सेवन केल्यास शिथिलता आणि कमजोरी निर्माण होण्याची शक्यता राहते. यामुळे प्रक्रिया केलेला मध खाण्यासाठी वापरावा, असे तज्ज्ञ सांगतात.

कच्चे काजू
बाजारातून आपण खरेदी करतो ते काजू हे कच्च्या काजूपासून भाजून किंवा वाफेवर तयार केलेले असतात. कच्चे काजू भाजल्याने त्यातील उर्शिऑल नावाच्या रासायनिक पदार्थाचा नाश होतो. या उर्शिऑलमध्ये विषारी तत्वे असतात. त्यामुळे कच्चे काजू खाल्ल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे अ‍ॅलर्जी होण्याचे प्रमाण अधिक असते.

बिया
सफरचंद आणि चेरीसारख्या फळांच्या बियांमध्ये एक प्रकारचे हायड्रोजन सायनाइड असते यालाच प्रूसिक अ‍ॅसिड म्हणतात. हे अ‍ॅसिड आरोग्यासाठी हानीकरण ठरते. यामुळे फळांमधील बिया असलेला भाग खावू नये.

बटाटे
अंकुरित बटाट्याचा वापरही आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. बटाट्याचे हिरवे अंकुर आणि पानांमध्ये ग्लायको अल्कोलाइड्स नावाचे रसायन आढळून येते, याच्या सेवनाने डायरिया, पोटदुखी आणि डोकेदुखी होऊ शकते. हे रसायन जास्त दिवस प्रकाशात ठेवल्याला बटाट्यामध्येही आढळून येते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु