पोट साफ होत नाही ? मग आवश्य करा हे घरगुती उपाय

पोट साफ होत नाही ? मग आवश्य करा हे घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ज्यांना बाउल मुव्हमेंट म्हणजेच पोट साफ न होण्याची समस्या सतत भेडसावते त्यांचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. अशा व्यक्तींना मलावरोध किंवा गॅसची समस्या निर्माण होते. घरगुती उपायांद्वारे बाउल मुव्हमेंट नियमित करता येऊ शकते. यासाठी काही उपाय असून ते सांगितल्यानुसार नियमित केल्यास खूप आराम पडू शकतो. ही समस्या अलिकडे अनेकांना जाणवते. केवळ जीवनशैली बिघडल्याने हा त्रास होतो. यावर कोणते उपाय आहेत, याविषयीची माहिती आपण घेणार आहोत.

पोट साफ होत नसल्यास सकाळी उठताच प्रथम कोमट पाण्यात लिंबू आणि शेंदी मीठ मिसळून प्यावे. नियमित हा उपाय केल्यास पोट साफ होईल. तज्ज्ञांच्या मते, फळांच्या ज्यूसमध्ये दूध मिसळून प्यावे. ज्या फळांमध्ये गर असतो, त्यांचे थेट सेवन करावे. भोजनानंतर दालचिनी पावडरचे सेवन करावे. ४.१०० मि.लि. पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे थोडा वेळ उकळा आणि भोजन करण्याच्या एक तास आधी ते पाणी प्यावे. तसेच भोजनानंतर ते मेथीचे दाणे चावून खावे.

भोजनानंतर गूळही खा. त्यामुळेही पचन व्यवस्थित होते. दररोज सॅलडचे सेवन करायला हवे. त्यात पालक, टोमॅटो, मुळा आणि काकडीचा समावेश असावा. तसेच सर्व प्रकारच्या फळांपासून बनलेल्या सॅलडचेही सेवन करायला हवे. दिवसभर भरपूर पाणी आणि ताक प्यायला हवे; जेणेकरून कडक शौचास होणार नाही. तसेच भाज्यांपासून बनलेले सूप व वरण यासारख्या द्रवपदार्थांच्या सेवनाचेही प्रमाण वाढवा. तंतूमय फळे व भाज्यांचे सेवन केल्यासदेखील शौचास कडक होत नाही आणि पचन व्यवस्थित होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु