हिवाळयात त्वचा कोरडी पडतीय ? करा हे नॅचरल उपाय

हिवाळयात त्वचा कोरडी पडतीय ? करा हे नॅचरल उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हिवाळा आला की त्वचा कोरडी पडण्यास  सुरुवात होते. त्वचा कोरडी पडली की त्याला सुरकुत्या पडून एखाद्या वयस्कर व्यक्तीप्रमाणे त्वचा दिसू लागते मग अशा वेळेला बाजारातुन बॉडी लोशन, मॉइश्च्युरायझर मागवले जाते पण तुम्हाला माहितीय का केमिकल असलेले बॉडी लोशन, मॉइश्च्युरायझर घेण्यापेक्षा घरघुती काही उपायांनी तुम्ही कोरड्या  त्वचेपासून सुटका करून घेऊ शकता. काही वेळेला केमिकलयुक्त  बॉडी लोशन, मॉइश्च्युरायझर चा तवचेवर विपरीत परिणाम झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.

पपई 
पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन ई असतं. यामुळे त्वचा कोरडी होण्यापासून रक्षण होतं. पपईचा गर काढून चेहऱ्यावर मसाज करावा. दर दिवशी नियमितपणे असं केल्यास त्वचा सुकतण्याची किंवा कोरडी पडण्याची समस्या उद्भवणार नाही.

दही 
दह्यामध्ये प्रोबायोटीक्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंटचं हे घटक असतात. यामुळे त्वचेचं पोषण होतं आणि त्वचा मॉइस्चराइज होण्यास मदत होते. दह्याचा फेस पॅक तयार कऱण्यासाठी पाव कपमध्ये दही घेऊन त्याच एक चोटा चमचा हळद आणि मध घालावा. हा पॅक 10 मिनिटं चेहऱ्याला लावून धुवून टाकावा.

कोरफड
कोरफड म्हटलं की ते केसांच्या त्वचेसाठी फार उपयुक्त मानलं जातं. इतकंच नाही तर कोरफडाचे अनेक फायदे आहेत. त्यातीलच एक फायदा म्हणजे कोरफड हे कोरड्या त्वचेसाठी फार उपयुक्त ठरतं. त्वचा मॉइस्चराइज करण्याची क्षमता कोरफडामध्ये असते. रात्री झोपताना कोरफडाचे जेल त्वचेला लावावं.

काकडी
तहान भागवण्यासाठी काकडी फायदेशीर मानली जाते. त्याचसोबत कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी काकडी उपयुक्त असते. काकडी, टोमॅटो यामुळे तुमच्या त्वचेतील पाणी टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे काकडीचे काप चेहऱ्यावर चोळावा. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु