छातीत जळजळ होते का? अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार

छातीत जळजळ होते का? अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  छातीत जळजळ होत असल्यास अपचनाचा किरकोळ त्रास होत आहे, असे समजून अनेकजण मेडिकलमधील गोळ्या अथवा सिरप घेतात. परंतु, छातीत जळजळ होणे हे गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसिज म्हणजेच जीईआरडी या आजाराचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या गंभीर होऊ शकते. या समस्येमध्ये पोटातील एक अ‍ॅसिड पुन्हा अन्न नलिकेत जमा होऊन अन्ननलिकेचे नुकसान करू शकते. यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. याकडे सतत दुर्लक्ष केल्यास अल्सर अथवा कँसरसारखा गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो. या समस्येचे संकेत वेळीच जाणून घेण्यासाठी त्याविषयी माहिती घेवूयात.

हे आहेत संकेत –

१) दिर्घकाळ छातीत जळजळ होणे.
२) तोंडात आंबट चव येणे.
३) दिर्घकाळ छातीत कळा येणे.
४) जेवण गिळताना त्रास होणे.
५) सुका कफची समस्या होणे.
६) दिर्घकाळ घशात खवखव होणे.
७) घशात गाठ तयार होणे.

अशी घ्या काळजी –

* धुम्रपान करू नका.
* मद्यपान करू नका.
* लठ्ठपणा वाढतो.
* तळलेले पदार्थ खाऊ नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु