ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तोंडाची स्वच्छता किती महत्वाची असते, हे आपण अनेकदा एकतो. जर तोंडाची स्वच्छता ठेवली तर अनेक आजार टाळता येतात. तोंडाची स्वच्छता राखली नाही तर विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. मात्र, कधी-कधी स्वच्छता ठेवूनही तोंडाची दुर्गधी येते, यामुळे अनेकजण त्रस्त असतात. स्वच्छता राखूनही तोंडाला दुर्गंधी येणे, यामागे विविध कारणे असू शकतात. त्यामुळे ही कारणे जाणून घेणे खूप महत्वाचे असते. तोंडाची स्वच्छता राखूनही जर दुर्गंधी येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या, कारण या दुर्गंधी मागे वेगळे कारण असू शकते.

सतत तोंडाची दुर्गंधी येत असेल तर टाइप २ डायबिटीस, लंग्स, लिव्हर आणि किडनी संबंधी आजार असण्याचे हे संकेत असू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. लंग्स इन्फेक्शनमुळेही अनेकदा सतत तोंडाची दुर्गंधी येते. त्यामुळे वेळीच टेस्ट करावी. लिव्हर इन्फेक्शनमुळे इनडायजेशनची समस्या होऊ लागते. तसेच तोंडाची दुर्गंधी येऊ लागते.

टाइप २ डायबिटीस झाल्यावर शरीरात ग्लूकोजचे प्रमाण कमी होत असल्याने तहान जास्त लागते. तोंड कोरडे पडते. शिवाय शरीरात मेटाबॉलिज्म बदल होऊ लागतात. त्यामुळेही तोंडाची दुर्गंधी येते. किडनी डिजीजमुळे शरीराक मेटाबॉलिक बदल होऊ लागतो. त्यामुळे तोडांची दुर्गंधी येऊ लागते. हिरड्यांची काही समस्या असेल तर पेरिओडोन्टिक नावाचा आजार होतो. यानेही तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. लाळ आपल्या तोडांला स्वच्छ ठेवते.

पण जेव्हा लाळ कमी तयार होते तेव्हा जेरोस्टोमिया किंवा तोंड कोरडे पडण्याची समस्या होते. लाळेत अ‍ँटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे तोंडात बॅक्टेरिया जास्त होत नाहीत. पण तोंड कोरडे पडत असेल आणि लाळ पुरेशी तयार होत नसेल तर बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. यामुळे तोंडाची दुर्गंधी येऊ लागते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु