उन्हामुळे अंगाला खाज येतेय ? तर मग करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, जाणून घ्या

उन्हामुळे अंगाला खाज येतेय ? तर मग करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : उन्हामुळे त्वचेला खाज येत असल्यास याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्वचेला येणाऱ्या खाजेकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकतो. कडक उन्हात जास्त वेळ फिरल्याने अनेकदा हा त्रास होतो. यावर काही घरगुती उपाय असून ते जाणून घेवूयात.

हे उपाय करा
१ कडक उन्हामुळे तत्वचेला खाज येत असल्यास बर्फाचे तुकडे खाज येत असलेल्या जागेवर लावा. चार ते सहा तासांच्या अंतराने असे करा.

२ खाज थांबविण्यासाठी मिठ, हळद आणि मेथी यांचे मिश्रण करून ते आंघोळीपूर्वी अंगाला लावा. पाच मिनिटांनी आंघोळ करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.

३ उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी कोरफडचा वापर करा. त्वचेवर कोरफड जेलसुद्धा लावू शकता.

४ उन्हामुळे अंगाला खाज येत असल्यास, जळजळ होत असल्यास दररोज स्वच्छ आणि ताज्या पाण्याने आंघोळ करावी.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु