‘त्या’ महिलेचे स्तनांची रहस्यमय पद्धतीने वाढ, डॉक्टर्सही चिंतेत

‘त्या’ महिलेचे स्तनांची रहस्यमय पद्धतीने वाढ, डॉक्टर्सही चिंतेत
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थायलंडच्या एका गावात राहणारी ४६ वर्षीय लॅम फ्रेइसी नुएन या महिलेला एक विचित्र शारीरीक त्रास सुरू झाला आहे. ९ महिन्यांपासून या महिलेचे स्तन अचानक बेढब पद्धतीने वाढू लागल्याने ती अस्वस्थ झाली आहे. स्तनांच्या वाढत्या आकारामुळे आणि वजनामुळे तिला चालताही येत नाही. चालण्यासाठी तिला कुणाचातरी आधार घ्यावा लागत आहे. तिचे स्तन अचानक अशा बेढब पद्धतीने का वाढू लागले आहेत, या प्रश्नाचे उत्तर डॉक्टरांकडे सुद्धा नसल्याने ते हैराण झाले आहेत.

लॅमवर उपचार कसे करायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे. लॅम या विचित्र त्रासाने त्रस्त असतानाच लॅमचा पतीही काही दिवसांपासून आजारी आहे. काही महिन्यांपूर्वी लॅमच्या पतीचा अपघात झाला होता. अजून तो त्यातून बाहेरही आलेला नाही. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी लॅमने प्रसारमाध्यमाद्वारे लोकांना मदतीसाठी आवाहन केले आहे. आपल्या स्तनांचा आकार वाढत आहे, याची थोडीशी जाणीव लॅमला साधारण ३ वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, त्यावेळी स्तनांचा आकार वाढण्याची गती खूपच कमी होती. परंतु, मागील ८ ते ९ महिन्यात तिच्या स्तनांचा आकार अचानक वाढला आहे. डॉक्टरांसाठी लॅमची ही स्थिती कोडं बनली आहे. लॅम आणि तिच्या परिवाराची आर्थिक स्थिती फार चांगली नाही.

त्यामुळे पुढील उपचार करण्यासाठी ती असमर्थ आहे. काही दिवसांपूर्वी तिने लोकांकडे मदत मागितली होती.लॅमने तिच्या या समस्येबाबत सांगितले की, हॉस्पिटलमध्ये खूप चकरा मारल्या. स्तनांमध्ये ट्यूमरसारखी कोणतीही बाब नसल्याचे डॉक्टर्स सांगत आहेत. डॉक्टर सर्जरीच्या माध्यमातून स्तन कापून बाजूला करू शकतात. पण जोपर्यंत ते वाढण्याचे कारण समजत नाही, तोपर्यंत असे करणे चुकीचे ठरेल. डॉक्टरांनी वेगवेगळ्या टेस्ट केल्या आहेत. टेस्ट केल्यावर कॅन्सरचे कोणतेही लक्षण अथवा ट्यूमर आढळला नाही. माझ्यासाठी माझे दोन्ही स्तन सर्वात मोठी अडचण ठरत आहेत. हे सांभाळण्यासाठी मला मानेला कपडा बांधावा लागतो. चालण्या-फिरण्यात त्रास होतो. यांच्या वजनामुळे मान आणि पाठीचा कणा दुखू लागला आहे. आता तर मी काठीचा आधार घेतल्याशिवाय चालू शकत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु