तुम्ही ‘हाय हिल्स’ घालता का ? मग पायांची ‘अशी’ घ्या काळजी ; जाणून घ्या

तुम्ही ‘हाय हिल्स’ घालता का ? मग पायांची ‘अशी’ घ्या काळजी ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उंच टाचांच्या सँडलमुळे पायात वेदना झाल्याने चालण्या-फिरण्यात अडचणी येऊ शकतात. याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर होऊ शकतो. चुकीचे फुटवेयर घालणे, एका ठिकाणी बसुन राहणे, यामुळे पायात अनेक समस्या निर्माण होतात. उंच टाचांचे सँडल घातल्याने पायाच्या तळव्यांना त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी काही खास उपाय करता येऊ शकतात.

हे उपाय करा

* फिट फुटवेयरमुळे दिवसभर पायांना ओलावा मिळत नाही. यासाठी घरी आल्यानंतर पाय पाण्यात बुडवून बसा. यामुळे पायांच्या मसल्सला आराम मिळतो. तसेच पायावर असलेले बॅक्टेरीया नष्ट होतात.

* हील्स काढल्यावर पायांना थोडा आराम द्या. नंतर पायांना गोल-गोल फिरवा, भींतीचा आधार घेऊन पायांच्या पंज्यावर उभे रहा आणि टाचांना खाली-वर करा.

* गरज नसेल तर जास्त हिल्सच्या चप्पल घालू नका. जर एक-दोन दिवस घातली तरी पुढील एक आठवडा स्नीकर्स कींवा फ्लॅट चप्पल घाला आणि पायांना आराम द्या.

* मॉइश्चराइजर लावा. दिवसभर बंद असल्याने पायांमध्ये शुष्कता येते, यामुळे चांगल्या क्वालिटीचे मॉइश्चरायजर टाचा, तळवे आणि बोटांना लावा.

* कोणत्याही आजाराच्या इलाजासाठी झोप महत्त्वाची असते. हिल्स घातल्यानंतर झोपतांनासुध्दा पायांवर खुप लक्ष ठेवा. झोपतांना पायांमध्ये एक उशी ठेवा, यामुळे पुर्ण आराम मिळेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु