तुम्ही पालथे झोपता का ? खुप हानिकारक ठरूशकते ही सवय, जाणुन घ्या

तुम्ही पालथे झोपता का ? खुप हानिकारक ठरूशकते ही सवय, जाणुन घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रात्री आपण कोणत्या स्थितीत झोपतो, याकडे फारसे कुणी गांभीर्याने पहात नाहीत. कारण त्यामुळे आरोग्यावर काही फरक पडतो, अथवा नाही याबाबत बहुतांश लोकांना काहीच माहित नसते. ज्या स्थितित झोपायला आवडते त्या स्थितीत झोपणे प्रत्येकजण पसंद कारतो. मात्र, झोपण्याच्या स्थितीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जर तुम्ही पालथे झोपत असाल तर आरोग्यासाठी ते खुप हानिकारक ठरु शकते. हे खुप घातक असून त्याचे दुष्परिणाम जाणून घेवूयात.

पाठीवर प्रभाव
पोटावर झोपल्यामुळे जॉइंट पेन, मानेच्या वेदना आणि पाठदुखीची समस्या होऊ शकते. यामुळे झोप पुर्ण होऊ शकत नाही आणि पुर्ण दिवस थकवा जाणवतो.

स्पाइनवरील ताण
पोटावर झोपल्याने स्पाइनवर ताण पडतो. स्पाइन एका पाइपलाइन प्रमाणे काम करते. आणि यावर ताण पडल्यामुळे शरीराचे इतर भाग सुन्न पडतात आणि संपुर्ण शरीरात वेदना होतात.

मानेच्या वेदना
पोटावर झोपल्याने डोके आणि स्पाइन सरळ रेषेत असतात. यामुळे मान दुखते. याला हार्नियेटेड डिस्क म्हणतात.

अशी घ्या काळजी
पोटावरच झोपत असाल तर जाड उशीचा वापर करु नका. लहान आणि पातळ उशीचा वापर करा. यामुळे डोके आणि मानेला त्रास होणार नाही. यामुळे चांगली झोप घेऊ शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु