हातांवर ‘हे’ ४ संकेत दिसतात का? असतील तर व्हा सावध, दुर्लक्ष करू नका

हातांवर ‘हे’ ४ संकेत दिसतात का? असतील तर व्हा सावध, दुर्लक्ष करू नका

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  बहुतांश आजाराचे संकेत आपले शरीर वेगवेगळ्या माध्यमातून देत असते. हे संकेत ओळखता आले तर योग्यवेळी उपचार केल्याने भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो. आपले हात सुद्धा विविध आजाराचे संकेत देते. हे संकेत कसे ओळखावेत, याविषयी माहिती घेवूयात.

तळव्यांना घाम
ताण आणि जास्त अ‍ॅक्टिव्ह थायरॉइडमुळे मेटाबॉलिजम जलद होऊन शरीर जास्त कॅलरी बर्न करते. यामुळे जास्त घाम येतो. ही समस्या जास्त झाली तर डॉक्टरांकडे जावे.

पोर्समध्ये सूज
हातांच्या पोर्समध्ये सूज असेल तर शरीरामध्ये जास्त कोलेस्टेरॉलचा हा संकेत आहे. हार्टसाठी हे धोकादायक आहे. यासाठी लसुण, अद्रक, बीन्स यांसारखे कोलेस्टड्ढॉल कमी करणारे पदार्थ खावेत.

खाज येणे
सतत खाज येत असल्यास एक्जिमा असू शकतो. यात त्वचेवर रॅशेज येणे, खाज येणे आणि त्वचा फाटणे असे होते. यासाठी व्हिटॅमिन ए युक्त क्रीम वापरा.

रेड पॅच
हातावर रेड पॅचेस आल्यास लिव्हरची समस्या असू शकते. लिव्हरचे कार्य योग्य होत नसेल तर रक्ताभिसरण खराब होते. यामुळे हातावर ब्लड वेसेल्स दिसतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु