खाद्यपदार्थाच्या पॅकिंगवरील सूचनांचे खरे अर्थ माहित आहेत का ?

खाद्यपदार्थाच्या पॅकिंगवरील सूचनांचे खरे अर्थ माहित आहेत का ?

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण दिवसभरात पॅकिंगमधील अनेक पदार्थांचे सेवन करतो. परंतु, हे पदार्थ खरेदी करताना फारच कमी लोक या पाकिटावरील माहिती काळजी पूर्वक वाचत असतील. शिवाय, या माहितीमधील अनेक शब्द आपल्या परिचयाचे नसल्याने त्याचा अर्थही अनेकांना समजत नाही. अनेकदा या सूचनांचे चूकीचे अर्थ आपण काढतो, तर कधी-कधी काही शब्दांमुळे आपली दिशाभूल होते. सर्वसाधारणपणे पदार्थांच्या पॅकिंगवर जे शब्द असतात त्याची माहिती आपण करून घेणार आहोत.

शुगर फ्री : असे पाकिटावर लिहिलेले असेल तर पाकिटातील पदार्थात साखरेचे प्रमाण अजिबातच नाही, असा अनेकांचा समज असतो. परंतु, तो चूकीचा आहे. कारण याच्या प्रत्येक सेवनात ०.५ मिलीग्रॅम इतके साखरेचे प्रमाण असते. यात कॅलरी आणि काबरेहायड्रेट असतात. कॅलरीज कमी करण्यासाठीच्या शुगर फ्री उत्पादनांत शुगर अल्कोहोल टाकले जाते. त्यामुळे डायरिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे शुगर फ्री पदार्थ आहे, म्हणून निर्धास्त होऊ नये.

नो अ‍ॅडेड शुगर : कॅलरी आणि काबरेहायड्रेटचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात नो अ‍ॅडेड शुगर उत्पादने घेतली जातात. याचा अर्थ संबंधित उत्पादन संपूर्णत: कॅलरी किंवा काबरेहायड्रेट फ्री असतात असे नाही. यामध्ये माल्टोडेक्सट्रिन, काबरेहायड्रेट असतात. फळे, दूध, भाजीपासून तयार उत्पादनात आधीपासूनच साखर असते.

फॅट फ्री : पदार्थाच्या पाकिटावर फॅट फ्री असे लिहिले असेल तर त्यामध्ये अजिबातच फॅट नाही, असे समजू नये. फॅट फ्रीचा अर्थ हा खाद्यपदार्थ पूर्णत: फॅट फ्री असा नसून प्रत्येक सेवनात ०.५ ग्रॅम फॅट असा होतो.

एनर्जी : असे लेबल उत्पादनाच्या आवरणावर असल्यास शरीरास मिळणाऱ्या एनर्जीची माहिती मिळते. ती किलो कॅलरीजमध्ये मोजली जाते. पुरुषांना दररोज २५००, तर महिलांना २००० किलो कॅलरीची आवश्यकता असते.

ऑल नॅचरल : याचा अर्थ शंभर टक्के नॅचरल असा होत नाही. यात रंग, कृत्रिम गंध किंवा सिंथेटिक घटकांचे प्रमाण कमी असते.

कॅलरी फ्री, झिरो कॅलरीज : कॅलरी फ्री याचा अर्थ, प्रत्येक सेवनात ५ कॅलरी असा होता. लो कॅलरीज म्हणजे प्रत्येक सेवनात ४० किंवा त्यापेक्षा कमी कॅलरी असा होतो. म्हणजे डाएट कोकच्या २५० मिलिलिटर बॉटलमध्ये १०५ कॅलरीज असतात.

ट्रान्सफॅट फ्री : ट्रान्सफॅटला हिडन फॅट असेही म्हणतात. याच्या प्रत्येक सेवनात ०.५ ग्रॅम फॅट असते. हे सामान्य फॅट्सपेक्षा अधिक घातक असतात. हे फॅट्स कमी करण्यासाठी डॉक्टर कमी खाण्याचा सल्ला देतात. याच्या सेवनामुळे वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. आणि चांगले कोलेस्टेरॉल कमी होतात. यामुळे हृदयविकार, मधुमेह, कर्करोगासारखे रोग होऊ शकतात. तसेच अशा पदार्थात जीवनसत्त्वे आणि खनिजेही नसतात.

नो कलर, नो प्रिझर्वेटिव्ह : यामध्ये कोणतेही कलर अथवा प्रिझर्वेटिव्ह नसते. त्यामुळे असे पदार्थ उघडून फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर पाच दिवसांच्या आत संपवावे, अशी सूचना केली जाते. असे उत्पादन सहास्तरीय पॅकेजिंगमुळे सील उघडण्याआधी सामान्य तापमानात ठेवले जाते.

अनस्वीटन्ड : असे उत्पादन गोड बनवण्यासाठी यात एक्स्ट्रा शुगर किंवा स्वीटनर टाकले जात नाही.

र्व्हिंग साइज : उत्पादनाच्या पाकिटावर खाण्याचे प्रमाण म्हणजेच सर्व्हिंग साइज दिलेला असतो. हे माहित असणे खूप गरजेचे असते. अशा पाकिटावर आहाराबद्दलही माहिती असते. याकडे दुर्लक्ष केल्यास इतर माहितींचा काहीच उपयोग नसतो. यामुळे कॅलरी आणि आहाराचे प्रमाण लक्षात येते. सर्व्हिंग पर पॅकेट यावरून पाकिटातील खाद्यपदार्थांतून किती सर्व्हिंग साइज मिळेल हे लक्षात येते. उदाहरणार्थ पाकिटावर दोन सर्व्हिंग साइज आणि ५-सर्व्हिंग पर पॅकेट असा उल्लेख असेल, तर एका पाकिटातील खाद्यपदार्थाचे दहा कप आणि पाच वेळा सेवन असा त्याचा अर्थ होतो.

कोलेस्टेरॉल फ्री : अशा पाकीटबंद उत्पादनात कोलेस्टेरॉलची मात्रा अजिबात नाही, असे समजू नये. याच्या प्रत्येक सेवनात २ मिलीग्रॅमपेक्षा कमी कोलेस्टेरॉल आणि २ ग्रॅमपेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅट्स असते. लो कोलेस्टेरॉलचा अर्थ प्रत्येक सेवनात २० मिलीग्रॅमपेक्षा कमी कोलेस्टेरॉल आणि दोन ग्रॅमपेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅट्स असा होतो.

लेस कोलेस्टेरॉल
अशा उत्पादनात फॅट असते. परंतु, अन्य प्रमाणित उत्पादनांच्या तुलनेत त्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी असते. उदाहरणार्थ एखाद्या आइस्क्रीमच्या १०० मिली पाकिटात १८.९ मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असेल, तर कमी कोलेस्टेरॉलच्या उत्पादनात फॅट्सचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु