जीवघेण्या ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

जीवघेण्या ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजकाल कार्डिअ‍ॅक अरेस्ट या आजराचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेक लोक कार्डिअ‍ॅक अरेस्टचा संबंध हार्ट अ‍ॅटॅकशी जोडतात. मात्र हार्ट अ‍ॅटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट यात मोठा फरक आहे.  हृदयाची क्रिया अचानक बंद पडते, तेव्हा कार्डिअ‍ॅक अरेस्ट येतो.  हृदय रक्ताचे पंपिंग करणेच थांबवते. परिणामी शरीराचा रक्तपुरवठाही बंद होतो.  मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्यानं शुद्ध हरपते.  कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे काय आणि त्याची लक्षणे आणि उपचार पद्धती याबद्दल जाणून घेऊ.

कार्डिअ‍ॅक अरेस्टची लक्षणे

कार्डिअ‍ॅक अरेस्ट येण्याआधी त्याची काहीच लक्षणं दिसत नाही. यामुळे  का कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
ज्यांना हृदयाचा आजार आहे, त्यांच्यात  कार्डिअ‍ॅक अरेस्टची शक्यता जास्त असते.
कधी कधी  कार्डिअ‍ॅक अरेस्ट येण्याआधी छातीत दुखणं,  थकवा किंवा अंधारी येणं, श्वास घेण्यास त्रास, छातीत धडधड, चक्कर, शुद्ध हरपणे , यांसारखी लक्षणं आढळतात.

 कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे रुग्णाला होणार त्रास

कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये रुग्ण दीर्घ श्वास घेऊ शकत नाही.
कार्डिअ‍ॅक अरेस्टच्या स्थितीत हृदयात असह्य वेदना जाणवू लागतात.
अचानक हृदयाचे ठोके वाढतात.
चक्कर येते.
कार्डिअ‍ॅक अरेस्टच्या आधी थकव्यासारखंही वाटतं.
रुग्णाची शुद्ध हरपते.

कार्डिअ‍ॅक अरेस्टवर उपचार

‘डिफायब्रिलेटर’द्वारे  छातीवर इलेक्ट्रिक शॉक देऊन बंद पडलेलं हृदय सुरू करता येऊ शकतं.
रुग्णाला कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (CPR) दिलं जातं, जेणेकरुन त्याच्या हृदयाचे ठोके पूर्ववत करता येतील.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु