‘अ‍ॅक्रो योग’ माहित आहे का ? जाणून घ्या माहिती आणि विविध फायदे

‘अ‍ॅक्रो योग’ माहित आहे का ? जाणून घ्या माहिती आणि विविध फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अ‍ॅक्रो योग एक शारीरिक क्रिया आहे. या योगात पार्टनरची आवश्यकता असते. योग, आरोग्य कला आणि अ‍ॅक्रोबॅटिक्स म्हणजेच हवाई कसरत याचा यात समावेश असतो. या तिन्ही क्रिया एकमेकांना संतुलित ठेवतात. योगाचा हा विधी पार्टनरशी संलग्न आहे.

हे महत्त्वाचे आहे

* बेस आणि फ्लायर हे यामध्ये महत्वाचे आहे. बेसच्या भूमिकेत असलेला व्यक्ती पाठीवर झोपून जमिनीच्या जास्त संपर्कात असतो. बेस हात आणि पायांच्या माध्यमातून फ्लायरसोबत संपर्कात असतो.

* फ्लायर बेसच्या भूमिकेतील व्यक्ती फ्लायरला हवेत ठेवते, तो हेवेमध्ये वेगवेगळे आसन आणि मुद्रा करतो. फ्लायरसाठी संतुलन, आत्मशक्ती आणि आत्मविश्वास आवश्यक असतो.

हे आहेत फायदे

* स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत मिळते. तसेच यामुळे मानसिक तणाव आणि नकारात्मकता दूर होते.

* योग, अ‍ॅक्रोबॅटिक्स आणि हिलिंग आर्टचे हे कॉम्बिनेशन शरीरातील प्रतिकारकशक्ती मजबूत करण्यास सहायक ठरते. प्रतिकारशक्ती मजबूत असल्यास व्यक्ती विविध रोगांपासून दूर राहतो.

* बेसची भूमिका पार पाडत असलेल्या व्यक्तीचे पाय मजबूत होतात तर फ्लायरच्या भूमिकेत असलेल्या व्यक्तीचा तणाव कमी होतो. अ‍ॅक्रो योगामधील विविध मुद्रा अशा आहेत, ज्यामुळे मांसपेशीचा विकास होण्यास मदत होते.

* रक्तसंचार आणि पाचन शक्ती सुधारते. तसेच अ‍ॅक्रो योगाच्या नियमित सरावाने  क्रॉनिक हेल्थ कंडिश उदा. डिप्रेशन, अनिद्रा, उत्तेजना आणि व्यग्रता समस्यांमधून मुक्ती मिळते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु