तुम्हाला आहेत का दातांसंबंधी असे गैरसमज ? जाणुन घ्या योग्य उत्तर

तुम्हाला आहेत का दातांसंबंधी असे गैरसमज ? जाणुन घ्या योग्य उत्तर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मानवी दात हा इनॅमल, डेन्टिन, पल्प या तीन प्रमुख रचनांनी बनलेला असतो. दातांबद्दल अनेक लोकांमध्ये आजही अज्ञान दिसून येते. तसेच अनेक प्रश्न मनात असतात. दातांची समस्या प्रत्येकाला येत असतात. या समस्या दूर करण्यासाठी काही खास उपाय आहेत. दातांसंबंधीत असणारे गैरसमजांचे योग्य समाधान आपण पश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात करून घेणार आहोत.

* फक्त रुट कॅनेल करून कॅप बसवली नाही तर चालते का?

रुट कॅनाल थेरेपी हा दात वाचविण्यासाठी शेवटचा उपाय आहे. दातांवर झालेल्या दुर्लक्षामुळे दाताला रुट कॅनालची गरज निर्माण होते. यामध्ये दातांच्या नसा पूर्णपणे बदलल्या जातात. यामुळे दाताला रक्त पुरवठा होत नाही आणि कालांतराने दात ठिसूळ होण्याची शक्यता असते. यामुळे कॅप बसवणे गरजेचे असते.

* फक्त सिमेंट भरल्याने दातदुखी थांबले का?

दातांना वेदना सुरु झाली म्हणजे आपल्याला दाताच्या नसांपर्यंत किड पोहोचली आहे हे समजावे. यावर उपाय म्हणजे रुट कॅनाल थेरेपी होय. फक्त सिमेंट भरल्याने दातांना वेदना होतात. यामुळे सूज येऊ शकते.

* दातांना ठणका फक्त थंड किंवा गोड खाल्ल्यानेच लागतो का?

हे चुकीचे आहे. ब्रशिंगच्या चुकीच्या पध्दतीमुळे ठणका लागू शकतो. दात घासण्यासाठी सॉफ्ट ब्रश आणि कमीत कमी टूथपेस्टचा वापर करावा. योग्य वेळेत ब्रश बदला. यामुळे दातांची झीज होणार नाही.

* दात काढल्याने डोळ्यांवर विपरीत परिणाम होतात?

हे चुकीचे आहे. दात व डोळ्यांना विभिन्न नसांचा पुरवठा असतो. दातांना नस क्रमांक ५ आणि डोळ्यांना नस क्रमांक २ या नसांचा पुरवठा असतो. तरीही अनेक रुग्णांना या बद्दल संभ्रम असतो.

* दाताला लागलेली किड काढता येते का?

दाताला किड लागणे हा शब्द चुकीचा आहे. दातांचे तीन थर असतात. दाताला किड लागलेली आहे की नाही हे ओळखायचे असेल तर दातांवर काळा डाग दिसतो. डोळ्यांना न दिसणारा सुक्ष्म जंतू दाताच्या जास्त संपर्कात येतात तेव्हा दात किडतो. यानंतर त्यावर योग्य इलाज केला जातो किंवा दात काढावा लागतो. परंतु वेदना होत नसल्या आणि दातावर डाग असेल तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. पुढे होणारा त्रास टाळता येऊ शकतो.

* फक्त एकाच बाजूने दात बसवले तर चालते का?

एकाच बाजूने दात बसवले तर चावून खाताना त्या बाजूच्या टि.एम. जॉइंटवर ताण पडतो. कालांतराने या गोष्टीमुळे त्रास होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु