‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा

‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा

आरोग्यानामा ऑनलाइन टीम :  वर्कआऊट करतेवेळी किंवा नंतर जोपर्यंत शरीरात वेदना होत नाहीत तोपर्यंत चांगला रिझल्ट मिळत नाही, असा काही लोकांचा समज आहे. परंतु, हा चुकीचा समज आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे, जास्त व्यायाम करणे, यामुळे मसल्सचे नुकसान होऊन वेदना होऊ शकते. विनावेदना वर्कआऊट कसे करावे, याबाबत माहिती घेवूयात.

हीट थेरेपी
उष्ण तापमानामुळे रक्त प्रवाहात वृद्धी होते. व्यायामानंतर मांसपेशींमध्ये वेदना होत असेल तर हलक्या उबदार पाण्याने अंघोळ करा. यामुळे मांसपेशा शांत होतील आणि त्यात वेदनाही होणार नाहीत. हीटिंग पॅडचा वापर करा.

ओमेगा ३-एस
सूजलेल्या आणि वेदनायुक्त मांसपेशींवर ओमेगा ३-एस फायदेशीर आहे. हे माशांच्या तेलात आढळते. माशांच्या तेलाची एक गोळी घ्यावी. शिवाय पालक आणि नट्समध्येही ओमेगा ३-एस असते.

बर्फ
वर्कआऊटनंतर ज्या ठिकाणी वेदना होत असेल त्याठिकाणी बर्फ लावल्याने सूज आणि दूखणे कमी होते. बर्फ १५ मिनिटांपेक्षा जास्त लावू नका.

स्ट्रेचिंग
मांसपेशींमध्ये तणाव आणि वर्कआऊटनंतर वेदना होत असतील तर स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंगमुळे ज्या मजबूत मांसपेशी असतात त्या लवचिक होतात आणि त्यामुळे इजा होण्याची शक्यता कमी होते.

मसाज
लुम्बर बॅक पेनमध्ये मसाज लाभदायक आहे. वर्कआऊटनंतर मांसपेशींमध्ये वेदना होत असतील तर मसाज करा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु