‘हार्ट अटॅक’ ची भिती वाटते का ? घाबरू नका ‘हे’ उपाय केले तर टाळू शकता धोका !

‘हार्ट अटॅक’ ची भिती वाटते का ? घाबरू नका ‘हे’ उपाय केले तर टाळू शकता धोका !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चूकीच्या जीवनशैलीमुळे आणि आहारामुळे अलिकडे हार्ट अटॅकचे प्रमाण जगभरात वाढले आहे. विशेष म्हणजे पूर्वी वृद्धावस्थेत ही समस्या भेडवासवत होती. मात्र, आता तरूणांमध्येही हार्ट अटॅकची समस्या दिसून येत आहे.

हार्ट अटॅक टाळण्यासाठी आरोग्याबाबत खूप सतर्क राहणे गरजेचे आहे. शिवाय, नियमित व्यायाम करणे सुद्धा आवश्यक आहे. तसेच योग्य आहार सुद्धा घेतला पाहिजे. हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी काही साधे आणि सोपे घरगुती उपाय असून त्यांची माहिती आपण घेणार आहोत.

हे उपाय करा

दही
आपल्या डाएटमध्ये दही नियमित सेवन करा. हे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते. यामुळे हार्ट डिसिजची शक्यता कमी होते.

उडीद डाळ
रात्री चार ते पाच चमचे उडीद डाळ पाण्यात भिजत ठेवा. ती सकाळी बारीक वाटून दुधात मिसळून प्या. यामध्ये साखर टाकू शकता.

दुधी भोपळा
दुधी भोपळा उकडून घ्या. यामध्ये जिरे, हळद, कोथिबीर मिक्स करून खा. हा उपाय आठवड्यातून तीन ते चार वेळा केल्यास हार्ट डिसिजचा धोका कमी होईल.

टोमॅटो
डाएटमध्ये नियमित टोमॅटोचा समावेश करा. यामधील लायकोपीन, बीटा केरोटीन, फोलोट, पोटॅशियम आणि व्हिटॅमीन सी हे कोलेस्ट्रॉल कमी करते. यामुळे हार्ट डिसिजचा धोका कमी होतो.

लेमन ज्यूस
भरपूर प्रमाणात लेमन ज्यूस प्या. यातील अँटिऑक्सिडंट शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यात मदत करतात.

तुप आणि गुळ
जेवणानंतर नियमित तुप आणि गुळ खा. यातील तत्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. रक्ताभिसरण चांगले होते आणि हार्ट डिसिजचा धोका टळतो.

गाजर आणि मध
आठवड्यातून दोन ते तीन वेळा गाजर ज्यूसमध्ये मध टाकून घ्या. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतात. आणि हार्ट अटॅकचा धोका टळतो.

बदाम आणि जिरे
तीन बदाम आणि चार मिरे घेऊन त्याची पावडर बनवा. यामध्ये चिमुटभर तुळशीच्या पानांची पावडर मिसळून नियमित पाण्यासोब घ्या. यामुळे हार्ट डिसिज होणार नाही.

लसुण
रोज सकाळी उपाशीपोटी एक ते दाने लसणाच्या पाकळ्या खा.

दुध आणि आवळा
एक ग्लास दुधामध्ये एक चमचा आवळा पेस्ट मिक्स करून प्या. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु