तुम्हाला घोरण्याची सवय आहे का? मग घरच्याघरीच करा ‘हा’ खास उपाय

तुम्हाला घोरण्याची सवय आहे का? मग घरच्याघरीच करा ‘हा’ खास उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जास्त थकवा तसेच बंद नाकामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते. या समस्येने अनेक लोक त्रस्त असतात. विशेष म्हणजे यामध्ये घोरण्याची सवय असलेल्या व्यक्तीपेक्षा अन्य व्यक्तीच जास्त त्रस्त असतात. काही घरगुती उपाय केल्यास ही समस्या दूर करता येणे सहज शक्य आहे.

करा हे उपाय
१) झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात इलायची पावडर टाकून प्यायल्याने घोरण्याची समस्या दूर होते.

२) रोज रात्री झोपण्याच्या अधार्तास अगोदर हळद टाकलेले दूध प्यायल्याने घोरण्याची समस्या दूर होते.

३) रोज कोमट पाण्यात मध टाकून प्यावे. यामुळे श्वासाच्या समस्या दूर होतात.

४) झोपण्यापूर्वी पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून गुळण्या केल्याने नाकाच्या छिद्रांची सूज कमी होते. श्वास घेण्यास अडचणी येत नाहीत.

५) रात्री झोपण्यापूर्वी मधासोबत ऑलिव्ह ऑइलचे सेवन करावे.

६) रात्री झोपण्यापूर्वी तुप थोडे गरम करून एक-दोन थेंब नाकात टाका. यामुळे घोरण्याची समस्या दूर होते.

७) नाकबंद असेल तर पाण्यात ट्री ऑइलचे काही थेंब टाकून दहा मिनिटासाठी वाफ घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु