तुम्हाला सतत राग येतो का ? रागावल्याने होतात अनेक रोग, जाणून घ्या कसे

तुम्हाला सतत राग येतो का ? रागावल्याने होतात अनेक रोग, जाणून घ्या कसे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रागावणे ही बोलणे, हसणे, रडणे सारखीच नैसर्गिक भावना असली तरी जास्त चिडचिड करणे किंवा राग दाबून ठेवणे दोन्हीही सवयी शरीर आणि मेंदूसाठी घातक ठरू शकतात. ही स्थिती अनेक समस्या निर्माण करू शकते. जास्त रागामुळे हृदयरोगाची शक्यता वाढते, असे संशोधनात आढळून आले आहे. यासाठी अशा सवयींपासून दूर राहावे.

हे परिणाम होतात

जखम
रागामुळे जखम भरण्याची प्रक्रिया मंद होते. एखाद्या सर्जरीनंतर जास्त चिडचिड करु नये, असे संशोधक सांगतात.

हाय ब्लड प्रेशर
ज्या व्यक्ती राग लपवतात किंवा दाबतात त्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो.

त्वचा
रागामुळे तणाव वाढतो. यामुळे सोरायसिस, एग्जिमा सारखे त्वचारोग होतात. यासोबतच रागामुळे जास्त थकवा येतो.

डोकेदुखी
राग मस्तिष्कच्या कोर्टीसोल हार्मोनला प्रभावित करतो. यामुळे मेंदूला ऑक्सीजन योग्य प्रकारे मिळत नाही आणि डोकेदुखी होते.

डायबिटीज
लहान लहान गोष्टींवर रागावल्यास टाइप-टू डायबिटीजचा धोका जास्त असतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु