अशक्तपणा दूर करण्यासाठी करा ‘हे’ ५ सोपे रामबाण उपाय

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा ‘हे’ ५ सोपे रामबाण उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीर अशक्त असल्यास त्रास जाणवतो. शिवाय  विविध आजार होण्याची शक्यता बळावते. क्षमतेपेक्षा जास्त काम करणे, अवेळी जेवण करणे, पूर्ण झोप न घेणे यामुळे शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे अशक्तपणा जाणवतो. ही समस्या घालवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते. अशक्तपणा, थकवा किंवा आजारी पडण्याची भिती असल्यास दूध, तूप, यासाख्या पदार्थाचा आहारामध्ये जास्त वापर करावा.

हे आहेत उपाय

* अशक्तपणा दूर करण्यासाठी भरपूर झोप आवश्यक आहे.

* गव्हाची चपाती, मुग किंवा हरभरा डाळ, पालक, पपई, मेथी, पत्तागोबी, फूलगोबीचा आहारात समाावेश करावा.

* सफरचंद, द्राक्ष, मोसंबी या फळांसह अंजीर, बदाम, पिस्ता, काजूचे सेवन करावे. वापर करावा.

* झोपण्याआगोदर एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा शुद्ध गावरान तुप, एक चमचा अश्वगंधा चूर्ण टाकून दुध सेवन करावे.

* लवणभास्कर चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, आनंदभैरव रस, लोकनाथ रस, संजीवनी बुटी, कुमारी आसव, द्राक्षासव, लोहासव यासारख्या पदार्थाचा वापर वैद्याच्या सल्ल्याने करावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु