तोंडाच्या  दुर्गंधीवर  करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या 

तोंडाच्या  दुर्गंधीवर  करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण जेवण केल्यावर जर व्यवस्थित चूळ भरली नाही किंवा पाणी पिलो नाही तरी आपल्या तोंडाची दुर्गंधी सुटते. ही दुर्गंधी आपल्याला तर नकोच असते. परंतु, आपण जर कोणाच्या शेजारी उभे राहिलो तर ती समोरची व्यक्तीही आपल्या जवळ उभी राहत नाही. त्यामुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधी येत असेल तर तुम्ही यावर उपाय शोधत असतात. तुम्हाला जर तुमची तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका करायची असेल तर खालील काही घरगुती उपाय करा.

१) लिंबू :

तुमच्या तोंडाचा वास येत असेल तर तुम्ही लिंबाच्या रसाला कोमट पाण्यात मिसळा. दिवसातून दोनदा या पाण्याच्या गुळण्या करा. तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल.

तोंडाच्या  दुर्गंधीवर  करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या 

२) लवंग :

तुमच्या तोंडाचा जर वास येत असेल तर तुम्ही जेवण झाल्यावर किंवा बाहेर जाताना तोंडात एक लवंग ठेवायला विसरू नका. लवंगमुळेही तोंडाला वास येत नाही.

तोंडाच्या  दुर्गंधीवर  करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या 
३) मोहरीचं तेल आणि मीठ :

दिवसभर जर तुमच्या तोंडाचा वास येत असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलात थोडंस मिठ टाका. या मिश्रणाने दातांना आणि हिरड्यांना मसाज करा. यामुळे तोडांतून येणारा वास कमी होईल.
तोंडाच्या  दुर्गंधीवर  करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या 

४) जास्त पाणी प्या :

तुमच्या तोंडाचा वास येत असेल तर तुम्ही जास्त पाणी प्या. कारण आपण जर पाणी पिलो नाही किंवा जास्त वेळ बोललो नाही तर आपल्या तोंडाचा वास येतो. त्यामुळे तुम्ही पाणी प्या.
तोंडाच्या  दुर्गंधीवर  करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या 

५) बडीशेप :

तोंडाचा वास येत असल्यास त्यावर बडीशेप हा खूप चांगला उपाय आहे. त्यामुळे जेवण झाल्यावर लगेच तुम्ही बडीशेप खा. यामुळे तुमच्या तोंडाचा वास येणार नाही. त्यामुळे ज्यांच्या तोंडाचा वास येतो. त्यांनी आपल्या सोबत सतत बडीशेप ठेवावी.

तोंडाच्या  दुर्गंधीवर  करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु