आरोग्याच्या किरकोळ समस्यांवर करा ‘हे’ नैसर्गिक उपचार

आरोग्याच्या किरकोळ समस्यांवर करा ‘हे’ नैसर्गिक उपचार

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पोटसाफ न होणे, पोटदुखी, सर्दी-पडसे, तोंड येणे, अशा छोट्या-छोट्या समस्यांवर घरगुती उपचार करणे सहज शक्य असते. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून हे उपचार करता येतात. या नैसर्गिक घरगुती उपचारांचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे हे उपाय करणे योग्य ठरते.

ओव्याचे सेवन केल्यास शरीरातील केमिकलची होणारी हानी टाळता येते. ओव्यात असणारे अँटिऑक्सिडेंटस विविध आजारांपासून बचाव करतात. २००८ मध्ये झालेल्या एका पाहणीनुसार इंग्लंडमधील ३५ टक्के नागरिक नैसर्गिक उपचार पद्धतीवर विश्वास ठेवतात.
ओव्याचे तेल प्रतिकाररोधकासारखे असून ओवा स्टेफिलोकोकस नावाच्या जीवाणूंचा नाश करतो. ओव्यात सफरचंदपेक्षा ४२ पट, बटाट्यापेक्षा ३० पट तर संत्र्यापेक्षा १२ पट जास्त अँटिऑक्सिडेंटस असतात, असे एका अमेरिकन संशोधनातून समोर आले आहे. घरातील आणखी एक औषधी पदार्थ म्हणजे दालचिनी होय. घसा दुखणे किंवा इतर समस्या दूर करण्याचे काम दालचिनी करते. दालचिनीतील अँटिऑक्सिडेंटस हे घशात संसर्ग करणाऱ्या किटाणूंचा नाश करतात. त्याचप्रमाणे या भागातील पेशींना होणारा संसर्गाचा धोका कमी करतात. एक कप पाण्यात दालचिनी टाकून गरम करावे आणि या कोमट पाण्याने चुळा भराव्यात.

तसेच चहामध्ये तुळशीची काही पाने टाकावीत. ज्या व्यक्तींच्या तोंडाला चव लागत नाही त्यांनी नियमित हा चहा घेतल्यास तोंडाला चव येते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तीन चमचे मध आणि एक चमचा दालचिनी पावडर एकत्र करून पेस्ट तयार करावी. झोपण्यापूर्वी ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. सकाळी चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. सतत भिती वाटत असल्यास एक चमचा आल्याची पावडर, एक कप सफरचंदाचा रस आणि अर्धा कप पाणी यांच्या मिश्रणाचे सेवन केल्यास चांगला फरक दिसून येतो.

तोंडात फोड आल्यास खडीसाखर आणि कापूर वाटून तोंडातील फोडांवर लावावा. काही दिवसांत आराम मिळतो. काळे डाग घालवण्यासाठी मेथीची पाने किंवा दाणे पाण्यात भिजवून वाटावीत. ही पेस्ट डागांवर लावावी. थोड्या वेळानंतर कोमट पाण्याने साफ करावे, यामुळे चांगला गुण येतो. पोटदुखी, शौचास साफ न होणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी पुदिना खूप उपयुक्त आहे. पोटदुखत असल्यास पुदिना तेल गुणकारी ठरते.

तोंडातील फोडांवर आणि उष्णतेच्या उपचारासाठी पुदिन्याचा वापर करावा. यात असलेली किटाणू प्रतिरोधक शक्ती संसर्ग टाळते. तसेच किड्यांनी चावले असल्यास किंवा त्वचेवर झालेल्या आजारातील सूज कमी करण्यासाठी तेजपत्ता उपयुक्त आहे. तेज पत्त्यामध्ये जखम चिघळण्यास विरोध करणारे गुणधर्म असल्याने प्राचीन काळापासून याचा वापर करण्यात येत आहे. दात स्वच्छ करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. गरोदरपणानंतर होणाऱ्या उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी तेजपत्ता लाभदायक आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु