सकाळी-सकाळी ‘ही’ कामे करा, तरच मिळेल आरोग्य, धनसंपदा

सकाळी-सकाळी ‘ही’ कामे करा, तरच मिळेल आरोग्य, धनसंपदा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सूर्योदयानंतर झोपून उठणे ही अतिशय वाईट सवय आहे. शास्त्रामध्ये सांगितले आहे की, सूर्योदय होण्यापूर्वी उठलेच पाहिजे. पण, काही लोक सूर्योदयानंतरही खूप उशीराने उठताता. अशा लोकांच्या शरीरावर वाईट परिणाम होत असतात. ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयापूर्वी झोपेतून उठणे आवश्यक आहे. सकाळी लवकर उठल्याने चांगले आरोग्य लाभते. याच आरोग्याच्या बळावर तुम्ही धनसंपन्न होऊ शकता. शिवाय सकाळी लवकर उठल्याने दिवसभर शरीर उर्जावान राहते. सकाळी कोणकोणती कामे करावीत तसेच अन्य काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

सकाळी उठल्यानंतर या गोष्टी करा

* सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यामुळे पोटाशी संबंधित छोटेछोटे आजार आपोआप बरे होतील. पोट साफ राहते आणि त्वचे संबंधी आजार बरे होतात. हा उपाय करण्यापूर्वी एखाद्या चिकित्सकाचा सल्ला अवश्य घ्यावा.

* नित्य कर्म आटोपून योगा आणि ध्यान करावे. यामुळे शरीराला  उर्जा प्राप्त होते. नियमितपणे योगा केल्याने व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. चेहऱ्याचे तेज वाढते. प्रदीर्घ काळापर्यंत वृद्धावस्थेच्या आजारांपासून रक्षण होते. शरीराचे अवयव मजबूत राहतात.

* एखाद्या कामाची सुरुवात चांगली झाली तर सर्वकाही चांगले होते. ही गोष्ट सकाळी लवकर उठण्यासही लागू होते.

* सकाळी-सकाळी लवकर उठल्यानंतर हातांचे दर्शन घेतल्यास संपूर्ण दिवस शुभ जाऊ शकतो.

* अंथरुणातून पाय खाली जमिनीवर ठेवताना भूमीला नमस्कार करावा आणि पाय खाली ठेवण्यासाठी क्षमा याचना करावी. धरणी ही माता आहे हे यातून स्पष्ट होते आणि तिच्याप्रती नम्रता व्यक्त होते.

* विज्ञानानेही मान्य केले आहे की, सकाळी लवकर उठणे शरीरासाठी लाभदायक आहे.

उशीरा उठण्याचे तोटे

* सूर्योदयानंतर झोपेतून उठल्याने चेहऱ्यावरील तेज नष्ट होते. वृद्धावस्थेपूर्वीच त्वचा निस्तेज होते.

* दिवसभर शरीरात आळस राहतो. काम करण्यासाठी उत्साह राहत नाही.

* प्रदीर्घ काळापर्यंत ही सवय तशीच राहिली तर शरीर कमजोर होते.

* रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु