संधिवातापासून दूर राहण्यासाठी करा ‘हे’ 7 नैसर्गिक उपाय, मिळेल आराम

संधिवातापासून दूर राहण्यासाठी करा ‘हे’ 7 नैसर्गिक उपाय, मिळेल आराम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उतारवयात हाडांची झीज झाल्याने सांधेदुखी होऊ शकते. मात्र, जीवनशैलीत काही बदल करून, आहारावरील नियंत्रण आणि नियमित व्यायाम केल्यास संधीवात दूर ठेवता येतो. संधीवात कोणत्याही वयात होऊ शकतो. गुडघेदुखी यामधील महत्त्वाची समस्या असते. हा आजार दूर ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

ही आहेत कारणे

काही लोकांची हाडे जन्मतः विकृत असतात.
सूज, दाह, जंतूंचा प्रादूर्भाव झाल्याने.
अपघातामुळे हाडांना मार लागणे.
हाड तुटणे, सरकण्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांनी हाडांना इजा होते.
वयोमानानुसार मणक्यांची, हाडांची झीज होते. हाडे ठिसूळ होतात.

गुडघेदुखीचे कारण
शरीरातील हाडांचा सांधा महत्वाचा असतो. संधीवात झाला तर हाडे कमजोर होऊन सांधे दुखीची समस्या निर्माण होते. सांधा म्हणजे गुडघा. हासुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी आणि संधिबंधांनी तयार होतो. अनेक क्रियांमुळे गुडघ्यांच्या हालचाली अधिक होऊन तेथील हाडे झिजणे, तेथील वंगण कमी होणे, किंवा अतिउष्णतेमुळे गुडघ्याला सूज येते. त्यामुळे गुडघ्याची समस्या सुरु होते.

हे आहेत उपाय

व्यायाम करा
वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करा. व्यायामुळे संधीवात दूर होण्यास मदत होते. स्नायु अधिक बळकट होतात. सांधे लवचिक राहतात. व्यायामामुळे शरिरातील प्राणवायूचे प्रमाण वाढते.

गरम आणि थंड थेरपी
वेदना टाळण्यासाठी गरम आणि थंड थेरपी करा. यामुळे वेदना कमी होतात. आंघोळ करताना गरम पाणी घ्या. झोपण्यासाठी घोंगडी किंवा गरम पॅडचा वापर करा. त्यामुळे ऊब मिळते. थंड उपचारासाठी बर्फाचा वापर करावा. टॉवेलमध्ये बर्फ घेऊन त्याचा शेक घ्यावा. त्यामुळे चांगला आराम मिळतो.

अ‍ॅक्युपंक्चर पद्धत
अ‍ॅक्युपंक्चर थेरपीत शरीरावर विशिष्ट प्रकारे पातळ सुईने टोचले जाते. हा प्राचीन चिनी वैद्यकीय उपचार आहे. सुज कमी करणे किंवा रक्ताभिसरण होण्यासाठी ही पद्धत अवलंबिली जाते. हे अ‍ॅक्यूपंक्चर संधिवात वेदना कमी करण्याची क्षमता आहे.

ध्यान धारणा
ध्यान धारणा केल्याने तणावातून सुटका होते. संधिवातावर नियंत्रण मिळवता येते. नैराश्य आणि संधिवातावर याचा फायदा मिळतो.

पचनप्रक्रिया
सांधेदुखीवर उपचार करताना पचन सुधारणे आवश्यक आहे. ज्यामुळे शरीरात आम्ल निर्मिती होणार नाही. दोन-तीन लसणीच्या पाकळ्या तुपावर किंवा एरंडेलावर परतून दिवसातून एकदा, असे दोन- तीन महिने खाव्यात. रोज रात्री झोपताना सुंठीच्या काढ्याबरोबर एरंडेल कोठ्यानुसार व वैद्यकीय सल्ल्याने घेणे.

हळद
संधिवात वेदना कमी करण्यासाठी हळद उपयोगी आहे. यातील क्युरक्यूमिनमुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

मालिश करा
संधिवात कमी करण्यासाठी मालिश करावे. संधीवातामुळे सांध्यांचा भाग कडक होतो किंवा सुजतो. ही सुज कमी करण्यासाठी मालिश करणे एक चांगला उपाय आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु