मासिक पाळी उशिरा येण्यासाठी करा ‘हे’ ८ नैसर्गिक उपाय, ‘नो साइड इफेक्ट’

मासिक पाळी उशिरा येण्यासाठी करा ‘हे’ ८ नैसर्गिक उपाय, ‘नो साइड इफेक्ट’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही महिला विविध कारणासाठी मासिक पाळी उशिराने येण्यासाठी औषधे अथवा इंजेक्शन घेतात. याचा साइड इफेक्ट् होण्याची शक्यता जास्त असते. तसेच यामुळे शारीरिक व्याधीसुद्धा होऊ शकतात. यासाठी काही नैसर्गिक उपाय करणे अधिक योग्य ठरते. मासिक पाळीच्या संभावित तारखेपासून सात दिवस अगोदर काही पदार्थांचे सेवन केल्यास पाळी ५ ते ७ दिवसापर्यंत उशिराने येते. हे पदार्थ कोणते, आणि त्याचा वापर कसा करावा, ते जाणून घेवूयात.

असे करा उपाय

१) हरभरा डाळ
या डाळीचे पीठ पाण्यात मिसळून सेवन केल्यास मासिक पाळी उशिराने येते. सकाळी रिकाम्या पोटी हे घ्यावे.

२) पुदीना
पुदीना रस दिवसातून दोनदा सेवन केल्यास मासिक पाळी उशिराने येते

३) तांदूळ
तांदळाचे पाणी दिवसातून तिनदा सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते.

४) डाळिंब
डाळिंबाची साल वाळवून तिची पावडर तयार करा. ही एक चमच पावडर पाण्यात टाकून रोज सकाळ-संध्याकाळ घ्या.

५) ओवा
ओव्याची पाने पाण्यात टाकून ऊब द्या. कोमट झालेल्या या पाण्यात मध मिसळून सेवन केल्यास मासिक पाळी उशिराने येते.

६) आवळा
आवळा पावडर किंवा रसाचे सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते.

७) व्हिनेगर
एक ग्लास पाण्यात ३ थेंब व्हिनेगर टाकून दिवसातून तीन-चार वेळा सेवन करा.

८) कडू पडवळ
रोज कडू पडवळची भाजी खाल्ल्यास मासिक पाळी उशिराने येते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु