अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्‍परिणाम

अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्‍परिणाम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्याचे संकल्प करायचे आणि ते अर्धवट सोडण्याची सवय अनेकांना असते. परंतु, अशा सवयीमुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. काही जण शरीर पिळदार करण्यासाठी अथवा आरोग्य चांगले राहण्यासाठी जिम सुरू करतात. मात्र, काही दिवसातच अचानक जिमला जाणे, बंद करतात. असे करणे कधीकधी धोकादायक ठरू शकते. अचानक जिम बंद केल्याने कोणते नुकसान होते, याविषयी जाणून घेवूयात.

हे होतात परिणाम

१) रोग प्रतिकारशक्ती
जिम सोडल्यानंतर योग्य आहार न घेतल्यास रोग प्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते. यामुळे वेगवेगळे आजार सहज जडू शकतात.

Image result for रोग प्रतिकारशक्ती

२) हृदयरोग
अचानक जिम सोडल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

Image result for हृदयरोग

३) मसल्स कमजोर होणे
जिम सोडल्यानंतर मसल्समध्ये कमजोरी येते. तसेच मसल्सची शक्ती कमी होण्याची शक्यता असते.

Image result for मसल्स कमजोर होणे

४) वजन वाढणे
अचानक जिम सोडल्याने शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस मंदावते. यामुळे वजन वाढू शकते.

Image result for वजन वाढणे

५) फिटनेसची कमतरता
जिम सोडल्याच्या काही महिन्यातच फिटनेस लेव्हल कमी होते. यामुळे शरीराचा आकारही बिघडू शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु