दाढदुखीच्या समस्येवर करा ‘हे’ ६ घरगुती उपाय ; जाणून घ्या

दाढदुखीच्या समस्येवर करा ‘हे’ ६ घरगुती उपाय ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दातदुखी प्रमाणेच अनेकांना दाढदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. दाढदुखीच्या वेदनाही खूप असह्य असतात. त्यामुळे आपल्याला हा आजार अतिशय त्रासदायक वाटतो. दाढदुखीवर उपचार केल्यानंतर काही वेळ या वेदना कमी होतात. पण, नंतर पुन्हा आपल्याला त्रास सुरु होतो. त्यामुळे दाढदुखीच्या समस्येवर तुम्ही जर काही घरगुती उपाय केले तर तुमची ही समस्या कमी होऊ शकते. तुम्हाला दाढदुखीच्या समस्येपासूनबचाव करायचा असेल तर  खाली दिलेले हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

१) दातांची आणि दाढीची स्वछता राखण्यासाठी जेवण झाल्यानंतर न विसरता चूळ भरावी. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.

२) दाढ दुखत असेल तर जास्त थंड, गरम आणि कडक पदार्थ खाणे टाळावे. लहान मुलांना चॉकलेट, गोड पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात द्यावे किंवा देणे टाळावे. यामुळे तुम्हाला दाढीदुखीची समस्या निर्माण होणार नाही.

३) तुमची जर खूप जास्त दाढ दुखत असेल तर तुळशीची ५ ते १० पाने स्वच्छ धुवून, कुटून त्याचा रस काढावा आणि त्यात कापराच्या ३ ते ५ वड्या मिसळाव्यात. कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणार्‍या दाढेत ठेवावेत. त्यामुळे दाढदुखी कमी होण्यास मदत होते.

४) कॉफी कमी प्यावी. चहा पिल्यानंतर पाण्याने गुळणी करा. तसेच तुम्ही जर जास्त प्रमाणात पाणी पिलात तर तुमची दाढ आणि दातदुखीची समस्या लवकर कमी होईल.

५) दाढीच्या आणि दातांच्या समस्येपासून जर तुम्हाला लांब राहायचे असेल तर सकाळी ब्रश करताना टूथब्रश स्वच्छ धुवून घ्या.

६) तुम्हाला जर तंबाखूचे व्यसन असेल तर तुम्हाला दाढ दुखीच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे शक्यतो व्यसन टाळा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु