Diabetesमध्ये अवश्य करावीत ‘ही’ ५ योगासन, मिळेल उत्तम आरोग्य

Diabetesमध्ये अवश्य करावीत ‘ही’ ५ योगासन, मिळेल उत्तम आरोग्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरात इन्सुलिन हार्मोनची कमतरता निर्माण होते किंवा हे इन्सुलिन तयार होत नाही तेव्हा डायबिटीज होतो. वजन कमी होणे, वारंवार इन्फेक्शन होणे, वारंवार यूरिन येणे, जास्त तहान-भूक लागणे हे डायबिटीजचे संकेत आहेत. डायबिटीजवर कायमचा उपचार शक्य नाही. डायबिटीजमध्ये उत्तम आरोग्य निर्माण करण्यासाठी काही योगासन असून ती नियमित करावीत. यामुळे उत्तम आरोग्य मिळू शकते.

मुद्रासन
जमिनीवर बसून हाताचे तळवे नाभीवर ठेवा आणि डाव्या हाताचा तळवा उजव्या हातावर ठेवा. यानंतर श्वास बाहेर काढून समोर वाकावे. हनुवटी जमीनीवर टेकवा. श्वास आत घेऊन पुन्हा पहिल्या पोझिशनमध्ये या. ही क्रिया ४-५ वेळा करा.
Related image

मेडिटेशन
ध्यान केल्याने तणाव कमी होतो. मेंदू शांत आणि एकाग्रचित्त होतो. योग्य प्रकारे मेडिटेशन केल्याने इन्सुलिन हार्मोन सुरळीत होण्यास मदत मिळते.

Image result for मेडिटेशन

सर्वांगासन
हा योगा केल्याने घश्याच्या आजुबाजूच्या थायरॉइड आणि पॅराथायराइड ग्रंथींचा व्यायाम होतो. हा योगा केल्याने ग्रंथीमध्ये योग्य प्रकारे रक्तप्रवाह होतो. एका चटईवर आरामात झोपा, दोन्ही हात पसरवा, हळुहळू दोन्ही पाय वर करा, हातांनी कंबरेला सपोर्ट देत पाय कंबरेपासून उचला.

Image result for सर्वांगासन

सूर्य नमस्कार
डायबिटीजच्या रोगामध्ये योगा करणे सर्वात सोपे आणि फायदेशीर असते. हा योगा केल्याने शरीरात योग्य प्रकारे रक्त प्रवाह होतो. हा योगा १ मिनिटात ४ वेळा करावा.

Image result for सूर्य नमस्कार
प्राणायाम
प्राणायामचे ८ प्रकार असतात. यामध्ये भ्रामरी आणि भस्त्रिका प्राणायाम डायबिटीजसाठी जास्त फायदेशीर असतात. भ्रामरी प्राणायाम केल्याने मन, मस्तिष्क आणि स्वादुपिंड तंत्राला फायदा होतो. भस्त्रिका प्राणायाम रक्तातील ऑक्सीजन लेव्हल वाढवते आणि कार्बनडायऑक्साइड लेव्हल कमी करते.

Diabetesमध्ये अवश्य करावीत ‘ही’ ५ योगासन, मिळेल उत्तम आरोग्य

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु