मधुमेहाच्या व्यक्तींनी बिनधास्त खावी ‘ही’ नॅचरल शुगर, ७ प्रकार जाणून घ्या

मधुमेहाच्या व्यक्तींनी बिनधास्त खावी ‘ही’ नॅचरल शुगर, ७ प्रकार जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम – सर्वच गोड पदार्थ हे साखरेपासून तयार केले जातात. लाडू, बर्फी, हलवा, गुलाब जामुन, केक असे सर्वच पदार्थ साखर टाकूनच बनविले जातात. म्हणून मधुमेह असणारे लोक आर्टिफिशिअल स्वीटनर्सचा वापर करतात. परंतु, हे खुप धोकादायक आहे. आर्टिफिशिअल स्वीटनर्स रिफाइन्ड शुगरच्या तुलनेत जास्त हानिकारक असते. म्हणून नैसर्गिक साखरेचा वापर करावा. साखरेचे सात नैसर्गिक प्रकार आपण जाणून घेणार आहोत.

याचा वापर करा

* खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते. जेवल्यानंतरसुध्दा खजून खाऊ शकता. याला ब्राऊन शुगरसाठी पर्याय मानले जाते. खजूर केकमध्येसुध्दा मिक्स करून खाता येतात.

* मध साखरेपेक्षा गोड असतो. म्हणून याचा वापर कमी प्रमाणात केला जातो. मधात अनेक औषधी गुण आहेत. अनेक आजारांसाठी फायदेशीर असते.

* ब्राऊन राईस सरबतचा पॅनकेक्स, साखरेच्या पाकातसुध्दा उपयोग केला जाऊ शकतो. ब्राऊन राइस उकळून तयार केले जाते. याची चव बटरसारखी असते आणि याचा स्वाद नट्ससारखी असते.

* नारळ उकडून घ्या आणि त्याला वळवल्यानंतर कोकोनट शुगर तयार होते. याची चव गोड असते. ज्यांना मधुमेहाचा जास्त त्रास होतो त्यांच्यासाठी कोकोनट शुगर चांगली आहे.

* गुळाने बद्धकोष्ठता आणि अपचन दूर करण्यास मदत होते. साखर खायची असेल तर गुळ वापरावा.

* हादेखील आर्टिफिशिअल साखरेसाठी चांगला पर्याय आहे. या झाडाच्या पानांमध्ये साखरेपेक्षा ३०० पट जास्त गोडवा असतो. ही नैसर्गिक साखर आहे आणि यामध्ये कॅलरी आणि कब्र्ससुध्दा कमी असते.

* सारख मिनरल्ससोबत खायची असेल तर ऊसाचा रस प्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु