‘डेंग्यू’च्या रुग्णांना ‘या’ ५ गोष्टींच्या सेवनाने मिळेल आराम, जाणून घ्या

‘डेंग्यू’च्या रुग्णांना ‘या’ ५ गोष्टींच्या सेवनाने मिळेल आराम, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  सध्या डेंग्यूच्या रूग्णांची संख्या जास्त असल्याचे डॉक्टरांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जास्त ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या खोबणीत व त्याभोवती तीव्र दुखणे, जास्त थकवा ही डेंग्यूची लक्षणे आहेत. या रूग्णांना थकवाही जास्त जाणवतो. काही विशेष शाकाहारी पदार्थांचे सेवन केल्यास या रूग्णांना आराम आणि ताकद मिळू शकते.

हे पदार्थ सेवन करा
कडूलिंबाची पाने
कडूलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास डेग्यूंच्या रुग्णांच्या शरीरातील संसर्गास प्रतिबंध होतो. रुग्ण लवकर बरा होतो.

गवती चहा, आल्याचा चहा
डेंग्यूच्या रूग्णांनी आल्याचा चहा प्यायल्यास ताप कमी होतो. तसेच गवती चहा घेतल्यास रूग्ण लवकर बरा होतो.

नारळपाणी
डेंग्यूच्या रूग्णांसाठी नारळपाणी पोषक आहे. यामुळे ताकद मिळते.

फळांचा रस
ताज्या फळांचा रस घेतल्यास डेग्यूला प्रतिबंध करता येणे शक्य आहे. यासाठी गाजर, काकडीचा ज्यूस तसेच हिरव्या भाज्यांचे सूप घ्यावे. यामुळे शरीरातील ऊर्जा भरुन निघते.

संत्रे
यातील सी जीवनसत्त्व हे अ‍ॅन्टीऑक्सिडन्टचे काम करते. शरीरात फायबर्सची क्षमता वाढते. अपचनाचा त्रास कमी होतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु