केसांमधील डँड्रफ (कोंडा) ‘या’ औषधी तेलांनी तात्काळ होईल नाहीसा, जाणून घ्या वापर प्रक्रिया

केसांमधील डँड्रफ (कोंडा) ‘या’ औषधी तेलांनी तात्काळ होईल नाहीसा, जाणून घ्या वापर प्रक्रिया

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – त्वचेतील मृत पेशींपासून डँड्रफ म्हणजेच केसात कोंडा तयार होतो. अस्वच्छता आणि वातविकारामुळे हा त्रास होतो, असे तज्ज्ञ सांगतात. कोंड्यामुळे डोक्यात खाज सुटते. शिवाय केसही गळतात. हा कोंडा कपड्यावरही पडलेला दिसतो. शँपू, तेल आदीने कोंडा पूर्णपणे दूर होत नसल्याने अनेकजण त्रस्त असतात. शिवाय शँपूचा वापर थांबविला की कोंडा पुन्हा होतो. हा त्रास कायमचा घालवण्यासाठी अनेक घरगुती रामबाण उपाय आहेत. घरात उपलब्ध काही पदार्थांचा वापर करून औषधी तेल बनविता येते. याचा चांगला परिणाम दिसून येतो.

असे तयार करा औषधी तेल

* थोडेसे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे दाणे बारीक करून घ्यावेत त्यामध्ये थोडासा लिंबाच्या पानांचा रस मिसळावा. या मिश्रणाचा लेप डोक्यावर ४ मिनिट लावून ठेवावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास केसातील कोंडा कायमचा निघून जातो.

* आवळ्याचा रस आणि ऑलिव्ह तेल एकत्र करून डोक्याची मालिश करावी. या उपायाने डँड्रफ निघून जातो.

* जास्वंदाचे फुल बारीक करून त्याची पेस्ट करून ही पेस्ट केसांवर लावल्यास डँड्रफ नष्ट होतो.

* खोबरे, एरंडी आणि मोहरीचे तेल प्रत्येकी एक चमचा घेऊन या तेलाने केसांच्या मुळापासून मालिश केल्यास काही दिवसातच कोंड्याची समस्या नष्ट होते.

* खोबरेल तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावे. या तेलाने दहा मिनिटे केसांना मालिश करावे. त्यानंतर गरम टॉवेल तीन मिनिट डोक्यावर ठेवावा. केस धुण्यापूर्वी हा उपाय करावा. यामुळे डँड्रफ नष्ट होईल.

* अर्धा कप नारळाचे तेल आणि ऑलिव्ह तेल कोमट गरम करून त्यामध्ये चार ग्रॅम कापूर टाकावा. या तेलाने आठवड्यातून एकदा डोक्याची मालिश करावी. काही दिवसांतच डँड्रफ निघून जातो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु