घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत

घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोकेदुखीची समस्या ही सर्वसामान्य असून ती सर्व वयोगटात दिसून येते. ही किरकोळ समस्या असली तरी त्रासदायक ठरते. या समस्येवर सतत पेनकिलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय करणे चांगले ठरते. यासाठी घरगुती बाम तयार केल्यास तो अधिक परिणामकारक ठरतो.

असा तयार करा बाम

साहित्य
१) शिया बटर ३ चमचा
२) पेपरमिंट ऑइल २० थेंब
३) लव्हेंडर ऑइल १५ थेंब
४) मेण ३ चमचा
५) नारळ तेल ३ चमचा

कृती
* एका भांड्यात मेण, नारळ तेल आणि शिया बटर घ्या.
* हे मिश्रण मायक्रोव्हेवमध्ये एका मिनिटापर्यंत गरम करा.
* मिश्रण पूर्णत: वितळले की बाहेर काढून थंड करा.
* थंड झालेल्या मिश्रणात एक-एक करुन सर्व तेल मिसळून घ्या.
* आता हे मिश्रण एका बाटलीत भरून फ्रिजमध्ये थंड होऊ द्या.
* तुमचा बाम तयार झाला असून डोकेदुखी झाल्यास तो डोक्याला लावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु