बाजारातील ‘कोल्ड्रिंक’ पेक्षा घरात अशी तयार करा आरोग्यदायी शीत पेय

बाजारातील ‘कोल्ड्रिंक’ पेक्षा घरात अशी तयार करा आरोग्यदायी शीत पेय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बाजारातील कोल्ड्रिंकमुळे शरीराची मोठी हानी होते. ऐवढेच नव्हे तर कँसरसारखा घातक आजारसुद्धा यामुळे होऊ शकतो. यासाठी आरोग्यास फायदेशीर अशी पेय तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता, जी अधिक चवदार आणि आरोग्यदायी असतात.

असे तयार करा घरगुती पेय

सफरचंद पेय
Image result for सफरचंद पेय

सफरचंद सालासकट बारीक चिरून घ्या. साखरेवर लिंबाची साल किसून ती सफरचंदात मिसळा. तीन कप गरम पाणी त्यात टाका. नंतर झाकण घालून ठेवा. हे गाळून घेवून चवीपुरती साखर घाला. नंतर चांगले ढवळून बर्फ टाकून प्या.

जिंजरेल
साखर व पाणी एकत्रित करून पाच ते सात मिनिटे उकळवा. हे थंड झाल्यावर आल्याचा रस व लिंबाचा रस गाळून त्यामध्ये टाका. ग्लासमध्ये दोन चमचे बर्फ व थोडा जिंजरेल सोडा किंवा पाणी टाकून प्या.

टोमॅटो व काकडी
Related image

कांदा व काकडी किसून घ्या. तीन कप टोमाटोचा ज्यूस, दोन चमचे लिंबाचा रस, दोन लवंगा, एक दालचिनी काडी, एक लहान कांदा किसून, अर्धा कप काकडीचा कीस, चवीपुरते मीठ, तीन चमचे साखर हे सर्व एकत्र करून फ्रीजमध्ये एक तासभर ठेवून नंतर गाळून घ्या. चांगले ढवळून, ग्लासात बफार्चे क्युब्ज घालून प्या.

कलिंगड सरबत

Image result for कलिंगड सरबत
कलिंगड कापून गर स्कुपने काढून एका बाउलमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा. उरलेल्या कलिंगडचा लाल भाग बारीक चिरून त्याच्या बिया काढून, त्याचा रस करा. गाळलेल्या रसात मीठ, साखर, मिरपूड, लिंबाचा रस टाका. हे तासभर फ्रीज मध्ये ठेवा. ग्लासात थंड सरबत आणि कलिंगडाचे तुकडे टाकून प्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु