गर्भनिरोधक गोळ्यांचा होऊ शकतो ‘सेक्स लाईफ’वर परिणाम

गर्भनिरोधक गोळ्यांचा होऊ शकतो ‘सेक्स लाईफ’वर परिणाम

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात. अनेकदा मुलांमधील अंतर राखण्यासाठी या गोळ्यांचा उपयोग केला जातो. काही वेळी शारीरीक संबंध उघड होऊ नयेत म्हणूनही या गोळ्यांचे सेवन केले जाते. लग्न झाल्यानंतर शरीरसंबंध आला तर ७२ तासांच्या आत गर्भनिरोधक गोळ्या घेऊ गर्भारपण टाळण्याचे प्रमाण खूपच मोठे आहे. परंतु, सतत या गोळ्या घेणे आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.

गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोन्स असल्याने सेक्स लाईफ संपृष्ठात येऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु बराच काळ या गोळ्या घेतल्याने महिलांमधील कामेच्छा कमी झाल्याचेही संशोधकांनी आढळून आले आहे.

गर्भनिरोधक गोळ्यांबाबत सल्ला देताना डॉक्टर सांगतात की, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने एखाद्या महिलेची कामेच्छा मंदावली असल्याचे जाणवल्यास तिने त्वरित गर्भनिरोधक गोळ्या बंद कराव्यात. गर्भनिरोधक म्हणून इतर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ते वापरताना देखील दोघांनी एकमेकांना विश्वासात घ्यावे. तसेच ते पर्याय वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु