लवंग एक ‘प्रभावी’ औषध ; ‘या’ अजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या

लवंग एक ‘प्रभावी’ औषध ; ‘या’ अजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मसालाच्या पदार्थांमधील एक महत्वाचा घटक म्हणजे लवंग होय. प्रत्येक स्वयंपाक घरात लवंग आवर्जून वापरली जाते. विशिष्ट प्रकारच्या चवीमुळे लवंग मोठयाप्रमाणात वापरील जाते. उत्कृष्ट चव असलेली लवंग अनेक आजारांवर प्रभावी उपाय आहे. लवंगेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन, स्निग्ध पदार्थ, खनिज पदार्थ, हायड्रोक्लोराइडमध्ये न विरघळणारी राख, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, सोडिअम, पोटॅशिअम, व्हिटामिन सी आणि ए मुबलक प्रमाणात असते. लवंगेचे काही प्रमुख उपायच आपल्याला माहित असतात. परंतु, लवंग अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे.

या अजारांवर करा उपाय

* लवंग डोळ्यासाठी चांगली असून टीबीचा नाश करते
* दमा घालवण्यासाठी लवंग फार उपयोगी आहे.
* डोकेदूखी, दातदूखीमध्ये लवंगांच्या तेलाचा लेप लावल्याने आराम मिळतो.
* जेवण केल्यानंतर रोज सकाळ-संध्याकाळ लवंग खावी. अ‍ॅसिडीटी कमी होते.
* अ‍ॅसिडीटी कमी करण्यासाठी १५ ग्रॅम हिरव्या आवळ्याच्या रसात, पाच बारिक केलेल्या लंवगा, एक चमचा मध आणि दोन चमचे साखर एकत्र करून प्यावे.
* डोके दुखत असल्यास लवंग गरम तेलात उगाळून डोक्यावर लाववा.
* घशाची सूज आणि खोकल्यावर लवंग गरम करून तोंडात ठेवावी.
* गरोदर महिलेस जास्त उलट्या होत असतील तर लवंग आणि मधाचे चाटण द्यावे.
* पोटदुखीत लंवगांचे तेल आणि साखर एकत्र करून खावे.
* ताप आल्यास चार लवंगा पाण्यात उगाळून ते पाणी प्यावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु