ब्रेस्ट कॅन्सरची प्राथमिक लक्षणे सांगणारी ‘ब्रा’ बनवल्याचा दावा

ब्रेस्ट कॅन्सरची प्राथमिक लक्षणे सांगणारी ‘ब्रा’ बनवल्याचा दावा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरीची प्राथमिक लक्षणे दाखवणारी स्मार्ट ब्रा तयार केल्याचा दावा मेक्सिकोतील ज्युलिअन रिओ चाण्टू या अठरा वर्षांच्या मुलाने केला आहे. या ब्रा मुळे महिलांना स्तनाच्या कॅन्सरचे निदान लवकर होवू शकते. ज्युलिअनच्या आईचा मृत्यू कॅन्सरने झाला होता. तिच्या कॅन्सरचे निदान वेळीच झाले असते तर ती वाचली असती, असे वाटू लागल्याने त्याने संशोधन करून ही ब्रा तयार केल्याचे म्हटले आहे. हे संशोधन अजूनही प्राथमिक स्वरुपात आहे.

अशी आहे ही ब्रा

१) ब्रेस्ट कॅन्सरचे निदान लवकर व्हावे म्हणून ज्युलिअनने ही ब्रा तयार केली असून या ब्रामध्ये दोनशे २०० सेन्सर्स आहेत.

२) ही ब्रा सुमारे १ तास ते एक आठवडा घातल्यास यातील सेन्सर्स हे स्तनाचा आकार, रंग, तापमान इत्यादी माहिती देतात. ही माहिती स्मार्ट फोन किंवा कम्प्युटरमध्ये जमा होते.

३) या ब्रामधील हीट सेन्सर्स रक्तपुरवठ्याचा, पेशींचा, पेशींच्या वाढीचाही कल पाहतात, त्याचा डाटा तयार करतात.

४) ब्रा ने जमा केलेल्या माहितीवर आर्टिफिशियल इंटिलिजन्सद्वारे प्रोसेस होवून कॅन्सरची शक्यता आहे की नाही हे सांगितले जाईल.

* स्तनाच्या कॅन्सरचे लवकर निदान करणारी यंत्रणा सध्या तरी उपलब्ध नाही. महिलांना गाठ असल्याचे लक्षात आल्यानंतरच त्या डॉक्टरांकडे जातात आणि मग पुढील तपासण्या होतात.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु