कोथिंबिरीची फुले अनेक आरोग्य समस्यांवर गुणकारी ! ‘हे’ आहेत ५ फायदे

 
कोथिंबिरीची फुले अनेक आरोग्य समस्यांवर गुणकारी ! ‘हे’ आहेत ५ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  पदार्थांची चव वाढविणारी कोथिंबिर सर्वच घरात नियमित वापरली जाते. शाकाहारी असो की मांसाहारी पदार्थ, बहुतांश कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबिरीत अनेक पोषणद्रव्ये असतात. यामुळे ती अनेक आजारांवर गुणकारी आहे. कोथिंबीरीपेक्षा तिच्या फुलांमध्ये अधिक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे फुले कधीही फेकून देऊ नका. या फुलांमुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.

कोथिंबिरीच्या फुलांचे उपयोग
१ पचनक्रिया सुधारते.
२ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधूमेहींसाठी हितकारी.
३ व्हिटॅमिन के हे हृदयाचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते.
४ झणझणीत पदार्थांमधील तिखटाचा त्रास होऊ नये म्हणून फायदेशीर.
५ यामुळे शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत होते.

अशी वापरा फुले
* जेवण तयार झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फुलं यांची सजावट करा. यामुळे तुमचा पदार्थ अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी होण्यासाठी नक्कीच फायदा होईल.
* नेहमीप्रमाणे खाद्यपदार्थांमध्ये कोथिंबिरीसह फुले चिरून टाकू शकता.

ही आहेत वैशिष्ट्ये
* यातील मायक्रोन्युट्रिएंट्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स असतात. तसेच डाएटरी फायबर्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, असतात.
* कोथिंबिरीची फुले खाण्यासाठी सुरक्षित असतात. त्याला विशिष्ट आणि तीव्र गंध असतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु