सिगारेटचा शरीरावर असा होतो गंभीर परिणाम, शरीराच्या ७ भागांना असतो धोका!

सिगारेटचा शरीरावर असा होतो गंभीर परिणाम, शरीराच्या ७ भागांना असतो धोका!

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सिगारेट ओढणे हे शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे. सिगारेटमध्ये ७००० केमिकल्स असतात. यापैकी ६९ केमिकल्स जास्त हानिकारक असतात. यामुळे गंभीर आजार होतात. या केमिकल्समुळे शरीराच्या विविध भागांवर दुष्परिणाम दिसून येतो. यातील निकोटिन शरीराला स्मोकिंग अ‍ॅडिक्ट बनवते. हे जीवघेणे धोके टाळायचे असतील तर सिगारेटचे व्यसन सोडणे हाच चांगला पर्याय आहे. अन्यथा कर्करोग, हृदयरोग, फुफ्फूसाचे आजार, किडनीचे आजार होऊ शकतात. सिगारेटच्या व्यसनामुळे शरीराच्या कोणकोणत्या भागावर वाईट परिणाम होतात, याची माहिती घेवूयात.

 

Related image

मेंदू
यामुळे मेंदूचा कॉर्टेक्सचा भाग पातळ होतो. स्मरणशक्ती कमजोर होते.

 

 

तोंड
यातील केमिकल्समुळे लाळ सुकणे, कॅविटी, दात कमजोर होणे, अशा समस्या होतात.

Image result for फुफ्फुस

फुफ्फूस
नियमित सिगारेट प्यायल्याने फुफ्फूसात टार जमा होते. यामुळे फुफ्फूसाचा कँसर होण्याची शक्यता नव्वद टक्के वाढते.

Related image
हृदय

यामुळे रक्तदाब वाढतो, आणि हार्टअटॅक येण्याची शक्यता वाढते.

Image result for डोळे

डोळे
डोळ्यांचा ओलावा संपतो. मोतीqबदूसारखी समस्या होते.

सिगारेटचा शरीरावर असा होतो गंभीर परिणाम, शरीराच्या ७ भागांना असतो धोका!

हाडे
यातील निकोटीनमुळे हाडे कमजोर होतात.

Image result for किडनी

किडनी
रक्ताभिसरण कमी झाल्याने किडनी खराब होण्याची शक्यता ५१ टक्क्यांनी वाढते.

Image result for डीएनए

डीएनए
सिगारेटमधील फेनानथरेन हे तत्व रक्तात मिसळून डीएनएचे नुकसान करते. यामुळे कँसर होण्याची शक्यता वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु