‘कोलेस्ट्रॉल’ कमी करण्यासाठी जीवनशैलीत व आहारात करा ‘हे’ बदल

‘कोलेस्ट्रॉल’ कमी करण्यासाठी जीवनशैलीत व आहारात करा ‘हे’ बदल

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कोलेस्ट्रॉल हे शरीरात विरघळत नाही. यामुळे हे रक्त नलिकांमध्ये जमा होते आणि नलिका संकुचित होतात. रक्तात कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे धमन्यांच्या भिंती कठीण होतात. त्यांची लवचिकता कमी होते आणि त्या हळूहळू अरुंद होऊ लागतात. अरुंद झालेल्या धमन्यांमधून संबंधित अवयवाला ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांचा अपुरा पुरवठा होतो. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक यांचा धोका वाढतो. रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करायचे असेल तर जीवनशैलीत व आहारात बदल करणे आवश्यक आहे. जाणून घ्या कोलेस्टेरॉल कसे कमी करावे.

१) मैदा, ब्रेड, पांढरा भात, बिस्किट यांसारखे पदार्थ कमी प्रमाणात खावेत.

२) सालासकट असलेली धान्य, न सडलेली धान्य म्हणजे लाल तांदूळ, लाल पोहे, सालासकट असलेल्या डाळी इत्यादींचा जेवणात समावेश करावा.

३) आहारात तंतुमय घटकांचा समावेश करा.

४) रोज सकाळी ३-४ लसणाच्या पाकळ्या खा.

५) रोज अर्धा तास चला किंवा व्यायाम करा.

६) आवळा किंवा कोरफड ज्यूस घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु