‘माउस’ आणि ‘कि बोर्ड’ च्या अतिवापराने होऊ शकतो हाताचा ‘कार्पल टनल सिंड्रोम’

‘माउस’ आणि ‘कि बोर्ड’ च्या अतिवापराने होऊ शकतो हाताचा ‘कार्पल टनल सिंड्रोम’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तुम्ही माउस आणि कि बोर्डचा दिवसभर वापर करत असल्यास आणि चुकीच्या पद्धतीने वापरत असाल तर तुमच्या मनगटात वेदना होऊ शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात हाताचा कार्पल टनल सिंड्रोम हो आजार सुद्धा होण्याची भिती आहे. त्यामुळे असा त्रास होत असल्यास वेळीच डॉक्टरांकडे जावे, तसेच काही योगासने केल्यानेही ही समस्या बरी होऊ शकते. शिवाय योग्यपद्धतीने माउस आणि कि बोर्ड हाताळला पाहिजे.

कार्पल टनल सिंड्रोम
कार्पल टनल सिंड्रोम म्हणजेच सीटीएस हा आजार हाताच्या मनगटातून जाणाऱ्या नसांवर दाब पडल्याने होतो.

हे योग करा

* दोन्ही हात जोडून नमस्कारच्या मुद्रेत बसा. दोन्ही हातांवर हलकासा दाब द्या. हातांना दोन्ही मनगटांकडे झुकवा. आता उजव्या हाताने डाव्या हाताकडे ४५ डिग्रीचा कोन करण्यासाठी धक्का द्या. त्यानंतर डाव्या बाजूने उजव्या हाताकडे हे आसन करा.

* बोटे जमिनीकडे इशारा करीत असल्याप्रमाणे मनगट खालील बाजूला झुकवा. नंतर उजव्या हाताने डाव्या हाताच्या बाहेरील भागास दाबा. हातात ताण निर्माण होईपर्यंत हे करा.

* पाठीच्या बाजूने हातांना नमस्कारच्या मुद्रेत जोडा. या स्थितीत हात सुमारे वीस मिनिटे ठेवा.

हे लक्षात ठेवा

१) की-बोर्ड योग्य ठिकाणी ठेवा. टायपिंग करताना मनगट वरच्या बाजूने जास्त वाकलेले ठेवू नका.

२) माउस आणि की-बोर्डचे काम करताना मध्येच ब्रेक घ्या. तसेच अधून मधून मनगटाबरोबरच दोन्ही हातांनाही वेगवेगळ्या दिशेत खेचा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु