सावधान ! ‘हे’ ६ पदार्थ पुन्हा गरम करून खाणे पडू शकते महागात

सावधान ! ‘हे’ ६ पदार्थ पुन्हा गरम करून खाणे पडू शकते महागात

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण जर रात्री एखादा पदार्थ बनवला तर तो वाया जाऊ नये म्हणून आपण तो पदार्थ सकाळी गरम करून खातो. किंवा एखादा खूप वेळापूर्वी बनवलेला पदार्थही आपण अनेकवेळा गरम करून खातो. पण काही पदार्थ असे असतात. ते पदार्थ गरम करून खाल्ले तर आपल्या शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारातील असे कोणते पदार्थ आहेत. जे गरम करून खाणे अजिबात चांगले नसते. ते आपण आज जाणून घेऊया.

१) बटाटे –

बटाटे हे अनेकांना खूप आवडते. ते खाऊन उरले तर आपण नंतर खाऊ असा विचार करून ते तसेच ठेवतो. पण हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते कारण बटाटे शिजवल्यावर त्यामध्ये बोटूलिज्म बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. त्यानंतर आपण त्याला गरम केले आणि ते खाल्ल्यावर बॅक्टेरियाची संख्या वाढू लागते. ज्यामुळे तुम्हाला फूड पॉयजनिंग होण्याचा धोका असतो.
सावधान ! ‘हे’ ६ पदार्थ पुन्हा गरम करून खाणे पडू शकते महागात
२) चहा – 

आपण अनेकदा चहा करतो आणि एखादी व्यक्ती जर चहा पियायची बाकी असेल तिच्यासाठी चहा तसाच ठेवतो. पण चहामध्ये टॅनिक ऍसिड असतं. चहा पुन्हा गरम केला तर याच प्रमाण वाढतं. ज्यामुळे लिव्हरला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

सावधान ! ‘हे’ ६ पदार्थ पुन्हा गरम करून खाणे पडू शकते महागात
३) मशरूम –

आपल्याकडे मशरूम हा पदार्थ अनेकजण आवडीने खातात. यामध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं आणि ही भाजी जर आपण पुन्हा गरम खाल्ली तर यातील प्रोटीनचं कंपोजिशन बदलतं, ज्यामुळे इनडायजेशन आणि हार्टसंबंधी समस्या होऊ शकतात. त्यामुळे मशरूमची भाजी उरली तर ती पुन्हा गरम करून खाऊ नका.

Image result for मशरूम की सब्जी
४) पालकभाजी –

पालकभाजी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या पालक भाजीमध्ये नायट्रेटचं प्रमाण भरपूर असतं आणि आपण जर उरलेली पालक भाजी पुन्हा गरम केली तर तीच नायट्रेट कार्सिनोजेनिकमध्ये रुपांतरित होतं. ज्यामुळे शरीरात टॉक्सिन्स निर्माण होतात.

सावधान ! ‘हे’ ६ पदार्थ पुन्हा गरम करून खाणे पडू शकते महागात
५) कुकिंग ऑइल –

कुकिंग ऑइलमध्ये एल्डिहाइड्सच प्रमाण खूप जास्त असते आणि हे पुन्हा गरम केल्याने त्या ऑइलमध्ये टॉक्सिन्स तयार होतात. जे पुढे जाऊन कॅन्सरचं कारण ठरू शकतात. त्यामुळे एकदा गरम केलेलं तेल पुन्हा गरम करून वापरू नये.

सावधान ! ‘हे’ ६ पदार्थ पुन्हा गरम करून खाणे पडू शकते महागात
६) भात – 

भात पुन्हा गरम केल्याने त्यात बेसिलस सेरियस बॅक्टेरिया तयार होतात आणि भात पुन्हा गरम केल्याने त्यात बॅक्टेरियांची संख्या दुप्पट होते. यामुळे डायरिया होण्याचा धोका अधिक राहतो. त्यामुळे भात गरम करून खाणे टाळा.

सावधान ! ‘हे’ ६ पदार्थ पुन्हा गरम करून खाणे पडू शकते महागात

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु