सावधान ! सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे होतात ‘हे’ आजार

सावधान ! सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे होतात ‘हे’ आजार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आरोग्य निकोप राहण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. विशेषत: लहान मुलांच्या हातांची काळजी विशेषत्वाने घ्यावी लागते. परंतु, सॅनिटायझरच्या वापराने त्याचे  शरीरावर दुष्परिणाम होतात. नकळतपणे लहान मुले अनेक अस्वच्छ ठिकाणी हात लावतात. उदा. गच्चीवरचे कठडे, पायर्‍या, मातीतला चेंडू, बूट किंवा चप्पलला हात लावणे, भिंतीला हात लागणे यासारख्या असंख्य मार्गाने मुलांच्या हातावर जंतू बसतात. हे जंतू काढण्यासाठी सॅनिटायझरचा काहीजण वापर करतात. सॅनिटायझरने हात स्वच्छ राहतात, असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे काही पालक शाळेतही मुलांसोबत सॅनिटायझरची बाटली देतात. परंतु, सॅनिटायझरच्या अतिवापराने त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात.

सॅनिटायझरच्या अतिवापर आजरांना निमंत्रण देतो. त्याऐवजी  साबण वापरणे कधीही चांगले कारण सॅनिटायझरमध्ये ६० टक्केपेक्षा जास्त अल्कोहोल असते. हे किटकांना मारण्यात सक्षम नसतात. हॅंड सॅनिटायझरमध्ये अक्लोहोलपेक्षा ट्रायक्लोनसची मात्रा जास्त असते. सॅनिटायझरमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊयात …

. हॅंड सॅनिटायझरचा वापर करणे आपल्या आरोग्याला चांगले नाही. कारण यामुळे तुम्हाला सर्दी, खोकलासारख्या आजाराचा सामना करावा लागेल.

२. यामुळे त्वचा रूष्क होते. सॅनिटायझरचा अति वापर केल्याने त्वचा ड्राय होते. एवढेच नाही तर त्वचेवरील आजार होतात.

३. यामुळे कॅन्सर होऊ शकतो. सॅनिटायझरमध्ये बिसफेनॉल ए नावाचे रसायन असते ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु