सावधान ! ‘अल्कोहोल’ मध्ये कधीही मिसळू नका ‘एनर्जी ड्रिंक्स’, हे आहेत धोके

सावधान ! ‘अल्कोहोल’ मध्ये कधीही मिसळू नका ‘एनर्जी ड्रिंक्स’, हे आहेत धोके

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मद्यपान करणारे काही जण अल्कोहोलमध्ये एनर्जी ड्रिंक मिसळून ते सेवन करतात. ही सवय अतिशय धोकादायक आहे. कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक्ससोबत मद्य सेवन केल्याने खाली पडून इजा होण्याचा धोका वाढतो, असे कॅनडातील संशोधकांना संशोधनात आढळून आले आहे.

असे केले संशोधन
१) शास्त्रज्ञांनी १३ लोकांवर हा प्रयोग केला.
२) जे लोक मद्यात एनर्जी ड्रिंक्स मिसळून पित होते, त्यांना विविध प्रकारच्या जखमा झाल्या होत्या.
३) संशोधनातील तेरापैकी दहा लोकांना स्वत:हून जखम झाली होती किंवा एखाद्या कारच्या अपघातात ते जखमी झाले होते.
४) जे लोक वरील दोन्ही प्रकारात येत नव्हते त्यांनी एक तर विनाकारण इतर लोकांशी वाद केला होता. अथवा कुठल्यातरी शारीरिक हिंसेत त्यांचा सहभाग होता.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु