सावधान ! पाय दुखणे हा असू शकतो हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत

सावधान ! पाय दुखणे हा असू शकतो हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भविष्यात येणारी शारीरीक संकटे काही संकेत देत असतात. हे संकेत ज्यांना ओळखता येतात ते या संकटावर सहज मात करू शकतात. अथवा त्याची तीव्रता खूपच कमी करण्यात निश्चित यशस्वी होऊ शकतात. आरोग्याशी संबंधित छोटी-छोटी लक्षणे ही मोठ्या आरोग्य समस्यांची सुरुवातीची अवस्था असू शकतात. अशा लक्षणांबाबत गांभिर्याने विचार केला पाहिजे. कारण तसे केले तर धोका टळू शकतो. मात्र, अनेकदा उपचार करण्यात उशीर झालेला असतो. यासाठी काही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.पाय दुखणे हा हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत असू शकतो. साधारणत: छातीत दुखणे हा हार्ट अ‍ॅटॅकचा पहिला संकेत आहे, असे अनेकांना वाटते. परंतु, रक्तप्रवाह बाधित झाल्यावर अनेक वेळा पायांपासूनही वेदना सुरू होऊ शकतात. पायांची रक्तवाहिनी प्लाकमुळे ब्लॉक होते. त्यामुळे स्नायूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आणि वेदना होऊ लागतात. त्यासाठी कमरेच्या खालच्या भागातील पोटऱ्या किंवा पायातील वेदनांकडे करू नका. वैद्यकीय भाषेत यास पेरीफेरल आर्टियल डिसिज असे म्हणतात. आर्टियल ब्लॉकेजमुळे होणाऱ्या पायातील वेदना व्यायाम करताना आणखीनच त्रासदायक ठरतात. कारण शरीराला आणखी ऑक्सिजनची गरज भासते.

तसेच पायातील फोडाकडेही कधीही दुर्लक्ष करू नका. पायाच्या अंगठ्यात किंवा बोटांच्यामध्ये फोड दिसून आला तर ते गंभीर आहे. कारण बॅक्टेरिया फोडास नुकसान पोहोचवू शकतात. अशा वेळी पीडिताचा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते. जे लोक पायात दिवसभर बूट घालून असतात त्या लोकांनी काही वेळासाठी मीठ टाकलेल्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवावेत. यामुळे फंगल इन्फेक्शनसाठी जबाबदार असलेल्या बॅक्टेरिया नष्ट होतील. साधारणत: पुरुषांना अशा समस्यांचा अधिक सामना करावा लागतो.
अन्न गिळण्यासाठी त्रास होत असल्यास ही गळ्याशी संबंधित समस्या आहे. ४० टक्के लोक अशा वेळी अँटिबायोटिक घेतात. मात्र,यासाठी बॅक्टेरिया जबाबदार असतात. श्वासनलिकेच्या वरच्या भागातील सूज, संसर्ग किंवा टॉन्सिल्समुळे असे होऊ शकते. दोन ते तीन दिवसांपर्यंत हा त्रास कायम राहिल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

जर संसर्ग टॉन्सिल्सच्या आत, लिंफ नोड्स आणि आसपास टिश्यूजपर्यंत पोहोचला तर तेथे मळही तयार होऊ शकतो आणि श्वासनलिका बाधितही होऊ शकते.गुडघेदुखी, कंपण किंवा आकस असल्यास त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. गुडघेदुखी दोन तासांच्या आत थांबत नसेल तर हा ऑस्टियो अर्थरायटिसचा संकेत असू शकतो. गुडघा शरीराचा महत्त्वाचा सांधा आहे. कारण गुडघ्यावर संपूर्ण शरीराचा भार असतो. तुम्ही व्यायाम करत आहात तर काही दिवसांसाठी तो बंद करावा. यादरम्यान गुडघेदुखी कमी होत आहे किंवा नाही हे तपासून पाहावे. जर हे लक्षण तीन महिन्यांपर्यंत कायम राहत असेल तर वेळ वाया न घालवता तातडीने डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. रूग्ण अ‍ॅक्युपंक्चरची मदत घेत असेल तर ४० टक्क्यांपर्यंत अर्थरायटिसच्या वेदनेतून सुटका होऊ शकते. अ‍ॅक्युपंक्चरमुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम जाणवत नाहीत. चरबी असलेल्या व्यक्तीने जर पाच किलो वजन कमी केले तर त्याला अर्थरायटिस होण्याचा धोका अर्ध्याने
कमी होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु