सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पेरॉसिटोमॉल ही गोळी तापेवर अगदी रामबाण उपाय आहे. त्यामुळे आपण ताप आली कोणाचाही सल्ला न घेता लगेच मेडिकलमध्ये जातो. आणि पेरॉसिटोमॉल ही गोळी घेतो. यामुळे आपला ताप तर लगेच कमी होतो. पण पेरॉसिटोमॉल या गोळीने आपले लिव्हर खराब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला न घेता तुम्ही जर पेरॉसिटोमॉल ही गोळी घेत असाल तर वेळीच सावध रहा.

१) २०० पेक्षा जास्त गोळ्यांमध्ये पेरॉसिटोमॉलचा वापर :

सध्या बाजारात २०० पेक्षा अधिक गोळ्या अश्या आहेत की, त्यात पेरॉसिटोमॉल हा गोळीचा वापर केला जात आहे. आणि लोकांना थोडा जरी त्रास झाला की लोक लगेच पेरॉसिटोमॉल ही गोळी घेतात. त्यामुळे अनेकांना तर या गोळीची सवय झालेली आहे. पण ही गोळी घेत असताना तुम्ही थोडा विचार करा. कारण यामुळे आपले लीव्हर  खराब होण्याची दाट शक्यता आहे.

२) अंगदुखी आणि तापेसाठी सर्वात जास्त वापरण्यात येणारी गोळी :

पेरॉसिटोमॉल ही गोळी भारतातच नाही तर पूर्ण जगात ताप कमी करण्यासाठी वापरली जाते. डॉक्टरही अनेक रुग्णांना रुग्णांना ही गोळी देतात. लहान मुलांनाही ही गोळी दिली जाते. पण ही गोळी आपल्या आरोग्यासाठी घातक आहे.

३) पेरॉसिटोमॉल घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या :

तुम्ही ताप आल्यानंतर लगेच गोळी घेण्यापेक्षा डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्या सल्यानेच ही गोळी घ्या. कारण आपण जर खूप जास्त प्रमाणात या गोळीचे सेवन केले तर याचा आपल्या आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण होतो. आणि आपले लिव्हर कामातून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही ही गोळी वारंवार घेत असाल तर तिचा तुमच्या आरोग्याला धोका आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु