सावधान ! चायनीज फूड खाताय ? हे लक्षात असू द्या

सावधान ! चायनीज फूड खाताय ? हे लक्षात असू द्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : भारतात चायनिज फूड ठिकठिकाणी उपलब्ध असल्याचे दिसून येते. अनेकजण जायनिजच्या हातगाड्या, हॉटेल्समध्ये येथील पदार्थांवर ताव मारतात. भारतात चायनीज फूड हे खूप मसालेदार असते. चायनीज फूडमध्ये जे पदार्थ टाकले जातात,ते वारंवार खाण्यात आल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकते. चायनीज फूड सोडियम ग्लुटामेट किंवा एमएसजी म्हणजेच सामान्य भाषेत अजिनोमोटो ज्यास म्हटले जाते ते टाकण्यात येते.ते आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
चायनिज फूडमध्ये जास्त मीठ टाकले जाते. भारतीय पदार्थांच्या तुलनेत यात ४० टक्के जास्त सोडियम असल्याने रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना ते हानिकारक आहे.चायनीज फूड्समध्ये मैद्याचे नूडल्स आणि तांदुळाचा जास्त वापर होतो. हे हाय कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ अपचन, लठ्ठपणा, मधुमेहासारख्या समस्या निर्माण करतात. चायनीज फूड खाण्यापूर्वी सूप आणि एपोटायजर्स घ्यावे. हा चांगला पर्याय ठरू शकतो. जास्त हेवी फूड घेणे टाळावे. चायनीज सॉस म्हणजेच सोया सॉस, होयसिन यामध्ये मीठ आणि साखर जास्त प्रमाणात असते. यामुळे याचा कमी वापर करावा.
जास्त पाालेभाज्या असणाऱ्या चायनिज डिश खाव्यात. चायनीज नॉनव्हेज डिशेज डीप फ्राय केल्या जातात. यामध्ये सॉसची मेरिनेटिंग असते. यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा, रक्तदाब या समस्या होऊ शकतात.मोमोजसारखे काही चायनिज पदार्थ वाफेवर तयार केले जातात. हे कमी कॅलरीचे असल्याने खाता येतील. चायनीज पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरी अधिक असल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे हे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. रस्त्याच्या बाजूला विकल्या जाणाऱ्या चायनीज फूडमध्ये हल्क्या दर्जाचे सॉस आणि इतर पदार्थ वापरले जात असल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु