सावधान ! जास्त मीठ खाता का? ‘या’ ६ चुकांमुळे मोडू शकतात हाडे, जाणून घ्या

सावधान ! जास्त मीठ खाता का? ‘या’ ६ चुकांमुळे मोडू शकतात हाडे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन : एखाद्या छोट्या दुखपतीने अथवा अपघाताने हाड मोडले असेल तर आपली हाडे मजबूत नाहीत, असे समजावे. वाढत्या वयात हाडे कमजोर होतात. परंतु, कधीकधी लहान वयातही हाडे कमकुवत होऊ शकतात. निरोगी आणि मजबूत हाडांसाठी योग्य आहार आवश्यक आहे. शिवाय जीवनशैली सुद्धा सुधारण्याची गरज असते. काही चूकांमुळे हाडे कमकुवत होतात आणि शरीराचे मोठे नुकसान होते. या चुका सुधारल्या तर वाढत्या वयातही हाडे मजबूत राहतात.

या चूका करू नका

१ जास्त मिठामुळे युरिनमधून कॅल्शियम बाहेर जाते. यामुळे हाडे कमजोर होतात.

२ बंद खोलीत जास्त वेळ राहणाऱ्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. हाडे कमजोर होतात.

३ जास्त दारू पिण्याची सवय असल्यास शरीराची कॅल्शियम अ‍ॅब्जॉर्ब करण्याची क्षमता कमी होते. यामुळे हाडे कमकुवत होतात.

४ जास्त कॉफी प्यायल्याने यातील कॅफीनमुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.

५ धुम्रपान करण्याची सवय असल्यास बोन्स टीश्यूजचे नुकसान होते. यामुळे हाडे कमजोर होऊन छोट्या अपघातानेही हाडे मोडतात.   तसेच लठ्ठपणा, थंडपेये पिणे यामुळेही हाडे कमजोर होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु