सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कॅन्सर एक प्राणघातक रोग आहे आणि पेशींच्या अनियंत्रित वृद्धीमुळे तो होत असतो.लठ्ठ लोकांना कॅन्सर होण्याचा धोका स्मोकींग करणाऱ्यांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक असतो अशी धक्कादायक माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. लठ्ठपणामुळे किडनी कॅन्सर , गर्भाशयाचा कॅन्सर आणि यकृताचा कॅन्सर यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लठ्ठपणा आणि कॅन्सर यांच्या कनेक्शनबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याची गरज आहे.

लठ्ठपणामुळे शरीरामध्ये साचलेले शरीरातील एक्स्ट्रा फॅट मेंदूला सिग्नल पाठवतात की त्यांना लवकरात लवकर पेशींचे विभाजन करायचे आहे. त्यामुळे पेशींना धोका पोहचतो आणि कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो. सध्या लठ्ठपणाचे प्रमाण खूपच वाढले आहे. लठ्ठपणामुळे एक किंवा दोन नाही तर तब्बल १३ प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात.

कॅन्सर हा बदलणारा आजार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच प्रकारची उपचारपद्धती वापरता येत नाही. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर कॅन्सरचे स्वरूप उलगडून त्यावर उपचार करणे आवश्‍यक झाले आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु