मधुमेहींनी ऑफिसमध्ये घ्यावी या गोष्टींची काळजी

 
मधुमेहींनी ऑफिसमध्ये घ्यावी या गोष्टींची काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन – बदललेल्या जीवनशैलीमुळे आजकाल मोठ्यांपासून ते अगदी लहान मुलांमध्येही मधुमेह आढळून येतो. जगभरामध्ये हा आजार चिंतेचा विषय बनला आहे. मधुमेह होण्याची अनेक कारणे आहेत. मधुमेह असेल तर आहाराकडे लक्ष देणे आणि अ‍ॅक्टिव्ह राहणे आवश्यक आहे. परंतु तुम्ही सतत कार्यरत असाल तर याकडे लक्ष देणे अवघड होऊन बसते. परंतु, थोडे नियोजन केल्यास ऑफिसमध्येही सहज डायबिटीजची काळजी घेता येते. डायबिटीज नियंत्रणासाठी काम सुरू होण्याआधीच तयारी केली पाहिजे. रात्री शांत आणि पूर्ण झोप घ्यावी. उठल्यानंतर एका तासातच नाश्ता करा आणि पाणी पिऊन ऑफिससाठी बाहेर पडावे. ऑफिसला जाताना इन्सुलिन सोबत असू द्या.

डायबिटीक असल्याचे ऑफिसमध्ये जवळच्या व्यक्तीला सांगून ठेवा. कारण काही समस्या निर्माण झाल्यास तातडीने उपाय करणे सोपे जाईल. ऑफिसमध्ये खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. थोडा थोडा वेळाने काहीना काही खावे. जंक फूडऐवजी हेल्दी डाएट घ्यावे. ऑफिसमध्ये पार्टी किंवा सेलिब्रेशन असेल तर थोडे खावे. डेस्कवर नेहमी हेल्दी स्नॅक्स ठेवा. यामुळे भूक लागल्यास तेच पदार्थ खाता येतील.ऑफिसमध्ये एका ठराविक वेळेनंतर जागेवरून उठून वॉक करा. ऑफिसमधून बाहेर पडताना लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर केल्यास ते अधिक लाभदायक आहे.

या आजारापासून दूर रहायचे असल्यास व्यायाम नियमित करावा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. दररोज थोडा हलका व्यायाम करावा. पोषक आहार घ्यावा. आहारात पोष्टीक कडधान्य, फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. यामुळे पोट भरलेले असल्याने प्रोसेस्ड आणि रिफाइंड फूड खाल्ले जाणार नाही. मद्यसेवन व धुम्रपान बंद करावे. मद्यसेवन केल्याने वजन वाढते शिवाय ब्लड प्रेशरन आणि ट्राायग्लिसराइडचा स्तरही वाढतो. धुम्रपान करणाऱ्यांना मधुमेह होण्याचा दुप्पट धोका असतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु