रक्तदान केल्याने ‘या’ आजारांपासून दूर रहाणे आहे शक्य

रक्तदान केल्याने ‘या’ आजारांपासून दूर रहाणे आहे शक्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एखाद्या अत्यावस्थ रूग्णाला रक्ताची गरज असताना रक्तदान केल्यास त्याचा जीव वाचू शकतो. म्हणूनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे म्हटले जाते. रक्तदानाचे प्रमाण वाढावे म्हणून आपल्याकडे सतत जनजागृती केली जाते. आपण रक्तदान हे दुसऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी करतो, अशी भावना सहाजिकच आपल्य मनात असते. मात्र, रक्तदानाने दुसऱ्याचे प्राण वाचत असले तरी याच रक्तदानामुळे आपण अनेक गंभीरापासून वाचू शकतो. दात्याने दिलेले रक्त एखाद्याचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावत असले तरी तेच रक्त दिल्याने रक्तदाताही हार्ट अटॅक आणि कॅन्सरसारख्या रोगांना दूर ठेवू शकतो. रक्तदान करण्याचे इतरही काही फायदे असून ते जाणून घेवूयात.

४३ ते ६३ वर्षे वयातील व्यक्तींनी प्रत्येक सहा महिन्याला रक्तदान केल्यास हार्ट अटॅकची शक्यता कमी होते, असे अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात म्हटले आहे. १२०० व्यक्तींवर साडेचार वर्षे झालेल्या संशोधनानुसार जे लोक वर्षात दोन वेळा रक्तदान करतात, त्यांना कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. याचे कारण देखील लोहाचे प्रमाण आहे. लोहाचे प्रमाण वाढल्यास शरीरात फ्री रॅडिकल्स वाढल्याने कॅन्सरची शक्यता वाढते. रक्तदान केल्याने लोहाचे प्रमाण नियंत्रणात राहते, असे तज्ज्ञ म्हणतात.

वजन कमी करायचे असेल तर तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करावे, असे तज्ज्ञ सांगतात. लोहाची पातळी वाढल्यास व्यक्तीसाठी ते घातक ठरते. लोहाचे प्रमाण वाढल्यास रक्त घट्ट होते. यामुळे विविध आजार होण्याची शक्यता बळावते. रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. नियमित स्वरुपात रक्तदान केल्याने रक्त पातळ राहते यामुळे आजारांना दूर ठेवता येते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु