‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – २७ हजार लोकांच्या जीवनशैलीवर संशोधन केल्यानंतर अमेरिकन संशोधकांनी निष्कर्ष काढला की, हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित न्याहरी करणे आवश्यक आहे. तसेच न्याहरी न करणाऱ्या लोकांच्या हृदयाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. जेवणाच्या वेळेवर व्यक्तीचे आरोग्य आवलंबून असते, असेही म्हटले जाते. न्याहरी न केल्याने शरीर हळूहळू कमकुवत होत जाते. यामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो. याचा परिणाम थेट हृदयावर होतो.

वेळेवर न्याहरी न घेतल्यास अथवा जेवण वेळेवर न घेतल्यास अनेक आजार होऊ शकतात. यासाठी न्याहरी नियमित घेतली पाहिजे आणि जेवणही वेळेवर घेतले पाहिजे. आहार वेळेवर न घेतल्यास काही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या समस्या कोणत्या आणि त्यांच्यावर कोणते उपचार करावेत याबाबत आपण माहिती घेवूयात.

अनियमित दिनचर्या आणि खान-पान यामुळे लोक मधुमेहाचे शिकार होत आहेत. मधुमेही रुग्णांना डोकेदुखी, थकवा यांसारख्या समस्या कायम असतात. मधुमेह असल्यास रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. तसे यावर कोणताच कायमस्वरूपी इलाज नाही, पण जीवनशैलीत बदल, शिक्षण आणि खान-पान इत्यादी सवयींमध्ये सुधारणा केल्यास या रोगाला पूर्णपणे नियंत्रित केले जाऊ शकते. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी ७० टक्के पथ्य, २० टक्के व्यायाम आणि १० टक्के औषधांचे योगदान असते.

अल्सर असलेल्या रुग्णांनी बदामाचे सेवन केले पाहिजे. बदाम वाटून त्याचे दूध तयार करा. हे दूध सकाळ-सायंकाळ पिल्याने अल्सर बरा होतो. जर संसर्गामुळे दात दुखत असतील तर लसणाच्या दोन-तीन कच्च्या पाकळ्या चावून खावेत. यामुळे संसर्ग दूर होईल आणि वेदनाही कमी होतील. डोळ्यात जळजळ होत असल्यास एक स्वच्छ कापड कोरफडीच्या रसात बुडवून त्याने डोळे पुसून घ्या. असे लागोपाठ केल्याने जळजळ कमी होईल. नाइट सूटमध्ये अँलर्जी पसरवणारे घटक सर्वाधिक असतात. नियमितपणे गरम पाण्यात कपडे धुवावेत. यामुळे अँलर्जी होणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु